एसटीमध्ये 8 हजार 22 पदांसाठी भरती

मुंबई : दुष्काळ ग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहक पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यामध्ये 8022 पदांसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जात महिलांचे 932 अर्ज प्राप्त झाले असून महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या 685 पदांसाठी  2406 अर्ज दाखल झाले आहेत. […]

एसटीमध्ये 8 हजार 22 पदांसाठी भरती
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : दुष्काळ ग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहक पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यामध्ये 8022 पदांसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जात महिलांचे 932 अर्ज प्राप्त झाले असून महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या 685 पदांसाठी  2406 अर्ज दाखल झाले आहेत.

या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा 24 फेब्रुवारीला घेण्याचे ठरवले आहे. चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची 100 गुणांची (50 प्रश्न) लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारे प्रवेश पत्र आणि परिक्षा केंद्राची माहिती एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.

परीक्षेबाबतची सूचना उमेदवारांना लघु संदेश (SMS) आणि त्यांच्या ईमेलच्या पत्त्यावर महामंडळातर्फे पाठवण्यात येईल. उमेदवारांनी महामंडळाच्या संकेतस्थळावरून आपले प्रवेश पत्रं प्राप्त करून घ्यावीत. तसेच प्रवेश पत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें