चलनी नोटांद्वारे व्हायरसचा संसर्ग शक्य; RBI चे संकेत

लोकांनी चलनी नोटांऐवजी डिजिटल पेमेंटसारख्या पर्यायांचा अधिक उपयोग करायला हवा, असा सल्ला आरबीआयने दिला आहे.

चलनी नोटांद्वारे व्हायरसचा संसर्ग शक्य; RBI चे संकेत

नवी दिल्ली : चलनी नोटांद्वारे कोणत्याही प्रकारचा व्हायरस आणि जीवाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरु शकतात. त्यामुळे लोकांनी चलनी नोटांऐवजी डिजिटल पेमेंटसारख्या पर्यायांचा अधिक उपयोग करायला हवा. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कैट) याबाबत रिझर्व्ह बँकेला एका पत्राद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने अप्रत्यक्षपणे असे उत्तर दिले आहे. (Reserve Bank of India indicated that there may be a risk of virus due to currency exchange)

नोटांद्वारे व्हायरस आणि जीवाणूचा प्रसार होतो का? याबाबत कैटने सातत्याने पापुरावा केला आहे. कैटने 9 मार्च 2020 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये नोटांद्वारे व्हायरस आणि जीवाणूचा प्रसार होतो का याबाबत माहिती देण्याची मागणी केली होती. त्याच्या उत्तरात आरबीआयने कैटला संकेत दिला आहे की, चलनी नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होऊ शकतो

कैटला पाठवलेल्या उत्तरात आरबीआयने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी त्यांच्या घरूनच मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्डसारख्या प्रणालींचा वापर करुन डिजिटल पेमेंट करावे. त्यामुळे तुम्हाला चलनी नोटांचा वापर करावा लागणार नाही. तसेच एटीएममध्ये जाऊन रोख पैसे काढावे लागणार नाहीत. तसेच प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनांचे पालन करावे.

कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, चलनी नोटांद्वारे कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा व्हायरसचा जलदगतीने प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही आरबीआयला त्याबद्दल प्रश्न विचारला. गेल्या वर्षभरापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर आत्ता आरबीायने आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं आहे. परंतु त्यांनी मूळ प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

ही बाबसुद्धा खरी आहे की, आरबीआयने असं कुठेही म्हटलेलं नाही की, नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होत नाही. उलट त्यांनी संकेत दिले आहेत की, चलनी नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होतो. त्यामुळेच त्यांनी डिजिटल पेमेंट करण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या

कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा

राज्यात कोरोनाचं सावट, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ‘ऑनलाईन’?

(Reserve Bank of India indicated that there may be a risk of virus due to currency exchange)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI