AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनी लॉड्रिंग प्रकरण : रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून सहा तास चौकशी

नवी दिल्ली : मनी लॉड्रिंग प्रकरणात सोनिया गांधींचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. वाड्रा यांच्यासोबत त्यांचे वकील सुमन ज्योती खेतान होते. रॉबर्ट वाड्रा यांनी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, असं वकिलाने सांगितलं. शिवाय यानंतर बोलावलं जाईल तेव्हा चौकशीला हजर राहू, […]

मनी लॉड्रिंग प्रकरण : रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून सहा तास चौकशी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

नवी दिल्ली : मनी लॉड्रिंग प्रकरणात सोनिया गांधींचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. वाड्रा यांच्यासोबत त्यांचे वकील सुमन ज्योती खेतान होते. रॉबर्ट वाड्रा यांनी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, असं वकिलाने सांगितलं. शिवाय यानंतर बोलावलं जाईल तेव्हा चौकशीला हजर राहू, असं त्यांनी सांगिलं. रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावला जाऊ शकतो.

या चौकशीदरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी डीलर संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ शिखर चढ्ढा यांच्याशी कोणतेही व्यावसायिक संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. मी मनोज अरोराला ओळखतो. तो माझा कर्मचारी होता. पण अरोराचे मेल लिहिल्याचा आरोप वाड्रा यांनी फेटाळला. याशिवाय लंडनमध्ये माझ्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नसल्याचंही वाड्रांनी सांगितल्याचं बोललं जातंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात वाड्रा यांना मनोज अरोरा, सुमित चढ्ढा, सी. थम्पी आणि संजय भंडारी यांच्यासोबतच्या संबंधांबाबत विचारलं जाऊ शकतं. याशिवाय ईमेल आणि पीएमएलए अंतर्गत दिलेल्या मनोज अरोराच्या जुबानीवरुनही वाड्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात लंडनमध्ये आठ ते नऊ प्रकारची संपत्ती, तीन व्हिला आणि सहा फ्लॅट यांबाबत विचारलं जाईल, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये संरक्षण आणि पेट्रोलियम व्यवहाराच्या डीलरशीपबाबत चौकशी होऊ शकते.

रॉबर्ट वाड्रा यांनी अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने गेल्या आठवड्यात वाड्रा यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तपासात सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन वकिलांनी अटकपूर्व जामीन मंजूर करुन घेतला होता. यानंतर कोर्टाने 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आणि वाड्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी कोर्टाने वाड्रा यांचे जवळचे सहकारी मनोज अरोरा यांना अटकेपासून 6 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम संरक्षण दिलं होतं.

काय आहे प्रकरण?

लंडनमधील ब्रायंस्टन स्क्वेअर येथील एका संपत्तीच्या खरेदीत मनी लाँड्रिंगच्या आरोपांसंबंधी हे प्रकरण आहे. ही संपत्ती 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि या संपत्तीचे मालक रॉबर्ट वाड्रा असल्याचा दावा केला जातोय.  तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सध्या फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीची चौकशी सुरु आहे. याच चौकशीतून मनोज अरोराचीही भूमिका समोर आली, ज्याच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा आरोप केला जातो, की लंडनमधील ही संपत्ती संजय भंडारीने 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी केली होती आणि 2010 मध्ये तेवढ्याच किंमतीला विकली. तर दुसरीकडे याच संपत्तीच्या डागडुजी आणि इतर कामावर 65 हजार पाऊंडचा खर्च करण्यात आल्याचं बोललं जातं. तरीही खरेदी केलेल्या रक्कमेतच ही संपत्ती रॉबर्ट वाड्रा यांना विकण्यात आली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.