कौंटुबिक वादाला कंटाळून महिलेचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफ जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले

कल्याण स्टेशनजवळ आत्महत्या करणाऱ्या महिलेला आरपीएफ जवान जितेंद्र यादव यांनी वाचवले (Woman Suicide Kalyan Station).

कौंटुबिक वादाला कंटाळून महिलेचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफ जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले

कल्याण : कल्याण स्टेशनजवळ आत्महत्या करणाऱ्या महिलेला आरपीएफ जवान जितेंद्र यादव यांनी वाचवले (Woman Suicide Kalyan Station). जीव धोक्यात घालून आरपीएफ जितेंद्र यादव यांनी महिलेला रेल्वे ट्रॅकमधून बाहेर काढले. सुमंगल वाघ असं या महिलेचे नाव आहे. ही महिला कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहते. कौंटुबीक वादाने त्रस्त असल्याने महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचललं (Woman Suicide Kalyan Station).

महिला कल्याण स्टेशनजवळ उभी होती. यावेळी समोरुन पुष्पक एक्सप्रेस गाडी येत असताना ती महिला रेल्वे ट्रॅकवरच उभी होती. आरपीएफ जवान जितेंद्र यादव यांनी तिला एक्स्प्रेस येत असल्याचे सांगितले आणि रेल्वे ट्रॅक पासून बाजू होण्यास सांगितले. परंतु आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आलेली महिला सरळ रेल्वे ट्रॅकवर झोपली.

महिला ट्रॅकवर झोपताच जवान जितेंद्र यांनी येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या चालकाला ओरडत इशारा केला. रेल्वे गाडीची गती कमी असल्याने इंजिन महिला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन पास झाले. दुसरा डबा पास होण्याआधीच जवान जितेंद्र यांनी रेल्वे ट्रॅकमधून महिलेला बाहेर खेचून काढले. जवान जितेंद्र यादव यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून महिलेला खेचले. त्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे.

संबंधित बातम्या :

चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक, मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, रेल्वेतून मृतदेह पाहताना खांबाला धडकून प्रवासी जखमी

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI