राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी

राज्याच्या गृह विभागाने पोलिसांच्या दक्षतेसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे (Rules for Maharashtra police vigilance).

राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 8:07 AM

पुणे : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत (Rules for Maharashtra police vigilance). मात्र, आता पोलिसांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. राज्यात 700 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने पोलिसांच्या दक्षतेसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे (Rules for Maharashtra police vigilance).

गृह विभागाची पोलिसांसाठी नियमावली

  •  अतिमहत्त्वाच्या दखलपात्र तक्रारींसाठी पोलीस ठाण्याच्या फोन नंबरवर संपर्क करण्यास सांगावं. तक्रारदारांना विनाकारण रेंगाळत ठेवू नये.
  • सर्व पोलीस चौक्या बंद करुन केवळ पोलीस ठाण्यातच काम करावे.
  • पत्र व्यवहारासाठी कमीत कमी कागदाचा वापर करावा, ई-मेल, ऑनलाईन पद्धतीचा जास्त वापर करावा.
  • मोबाईलद्वारे पोलीस नियंत्रण कक्षात दिलेली माहिती गुन्ह्याची पहिली खबर समजून पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी आणि तपास करावा.
  • पोलिसांची गस्त घालण्याच्या पद्धती बदलून ड्रोनच्या सहाय्याने गस्त घालावी, तंत्रज्ञानाचा वापर करावा.
  • दोषारोप सरसकट दाखल करु नये.
  • पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण टनेलमधून प्रवेश द्यावा.
  • मास्क घातला असेल तर प्रवेश द्यावा, अन्यथा कारवाई करावी.
  • तक्रारदारासोबत फिजिकल डिस्टन्स मेंटेन करुन संभाषण करावं.

महाराष्ट्रात पोलिसांवर कोरोनाचं संकट आणखी गडद

राज्यात काल दिवसभरात (9 मे) 183 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्तांमध्ये 81 अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 71 अधिकारी आणि 577 अशा एकूण 648 पोलिसांना कोरोनाची लक्षणं आहेत. 10 अधिकारी आणि 51 पोलीस कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन B

पोलिसांवरचा ड्युटीचा ताण आणि कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या पाहता, त्यांना आराम मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबईत लष्कर आणण्याची गरज नसून, पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, दिवसभरात 1,165 नवे रुग्ण

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.