Video | जुन्या कारला मॉडिफाईड केलं, आता ओकते आग, ‘ड्रॅगन कार’चा व्हिडीओ व्हायरल

सध्या तर एक अतिशय वेगळ्या पद्धतीची कार चर्चेत आली आहे. ही कार चक्क आग ओकते आहे. रुसमध्ये ही कार तयार करण्यात आली आहे.

Video | जुन्या कारला मॉडिफाईड केलं, आता ओकते आग, 'ड्रॅगन कार'चा व्हिडीओ व्हायरल
FIRE DRAGON CAR


मुंबई : या जगात एकापेक्षा एक महागड्या कार आहेत. महागड्या आणि उंची कार वापरण्याची अनेकांना हौस असते. आपल्याही दारात अशी एखादी महागडी कार उभी असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.  तर काही लोकांना वेगवेगळे दमदार फिचर असणारी कार आवडते. सध्या तर एक अतिशय वेगळ्या पद्धतीची कार चर्चेत आली आहे. ही कार चक्क आग ओकते आहे. रुसमध्ये ही कार तयार करण्यात आली आहे. (Russian man Vahan Mikaelyan created first fire throwing car like dragon video went viral on social media)

जुन्या कारलं केलं मॉडिफाईड

मिळालेल्या माहितीनुसार रुसमध्ये Vahan Mikaelyan नावाच्या व्यक्तीने ही कार तयार केली आहे. ही कार एखाद्या ड्रॅगनप्रमाणे आग ओकते. नेटकरी ही कार पाहून अवाक् झाले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कार जवळपास वीस फूट लांब आग ओकते. या कारला ड्रॅगन कार म्हणून ओळखलेजात आहे. Vahan Mikaelyan यांच्याजवळ VAZ-2106 Zhiguli VAZ-2106 Zhiguli नावाची एक जुनी कार होती. या कारला डेव्हलप करताना Vahan यांनी कारला flamethrower nozzles लावले. flamethrower nozzles च्या मदतीने या कारमधून आग फेकली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आग ओकतानाचा या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडओ रेडिट अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मुळच्या रुसच्या या कारची जगभरात चर्चा होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Video | इवल्याशा दुचाकीवर डोंगराएवढं सामान, हेवी ड्रायव्हरची हिम्मत एकदा पाहाच

(Russian man Vahan Mikaelyan created first fire throwing car like dragon video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI