काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला

नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याचे म्हटले (Saamana Editorial on Filmcity).

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 10:09 AM

मुंबई : नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याचे म्हटले (Saamana Editorial on Filmcity). योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यानंतर आज (25 सप्टेंबर) सामना अग्रलेखातून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. तसेच काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, असा खोचक सल्लाही भाजपला दिला आहे (Saamana Editorial on Filmcity).

“लॉकडाऊनमुळे चित्रीकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली आहे. अर्थात मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील. खरं तर 370 कलम हटवल्यानंतर केंद्राने कश्मिरात अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतास चित्रीकरणासाठी काश्मीर, सिमला, मनाली, शिलाँग अशा भागांची भुरळ पडली होती. रोमॅण्टिक गाण्यांसाठी काश्मीर हे आवडते ठिकाण होते. तेथेही भव्य फिल्मसिटी उभारता येईलच. शिवेटी प्रत्येकाने भारतीय सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे. दादासाहेब फाळके व महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना समावून घेतले. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरु आहे. पण इतर राज्येही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा”, असं सामना अग्रलेखात म्हटले आहे.

“मुंबईसह जगात किंवा देशात जे महत्त्व प्राप्त झाले त्यात सिनेउद्योगाचा वाटा महत्त्वाचा आहे. मुंबई ही मायानगरी आहे असे जे म्हटले जाते ते बहुधा यासाठीच. मुंबईतील सिनेजग व त्यास मिळालेली प्रतिष्ठा ही काही एका रात्रीत पावसाळी छत्रीप्रमाणे उगवलेली नाही. मुळात भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे दादासाहेब फाळके हे मराठी मातीचे सुपुत्र होते. चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवताना त्यांना जो संघर्ष करावा लागला, खस्ता खाव्या लागल्या त्यातून त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचे बीज रोवले. 1911 मध्ये दादासाहेबांनी मुंबईत ‘लाइफ ऑफ जिझस ख्राईस्ट’ हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले नवे संघर्ष आणि ध्यासपूर्व सुरु झाले. संपूर्ण स्वदेशी चित्रपट बनवायचाच या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथून यंत्रसामग्री व इतर माल मागवण्यासाठी नोंदणी केली. हे सर्व करताना त्यांना स्वत:चे घरदार, पत्नीच्या अंगावरी दागिने गहाण ठेवावे लागले. भारतीय बनावटीचा पहिला मराठी मुकपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला. त्याचे नाव ‘राजा हरिचंद्र’ त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीने मागे वळून पाहिले नाही”, अशी चित्रपटसृष्टीबद्दलची थोडक्यात माहिती अग्रलेखात दिली आहे.

“मुंबई म्हणजे चित्रपटसृष्टीची जन्मभूमी किंवा कर्मभूमी हे ठसवण्यात गेल्या शंभर वर्षात अनेकांचे योगदान आहे. कोल्हापुरात मराठी सिनेमे तर मुंबईत हिंदी सिनेमे वर्षानुवर्ष तयार होत आहेत. मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यात मायानगरीचे अस्तित्व हे कारण आहेच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे का, अशी शंका येऊ लागली आहे”, असंही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

“मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते गर्दुल्ले बनले आहेत. कला वगैरे सोडून त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे एक विदारक चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे. बरं याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करुन घेतलाच आहे. गुजरातमध्ये मोदी व सलमान खान पंतग उडवीत होते. अमिताभ बच्चन तर गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर होते. मोदी यांची आंबे खाण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती याची सखोल माहिती जनसामान्यांना प्राप्त व्हावी म्हणून अभिनेता अक्षय कुमार यांच्यावर खास जबाबदारी होतीच. मोदी यांच्यावरील चित्रपटात विवेक ऑबेरॉय तर मनमोहन सिंह यांच्या चित्रपटात अनुपम खेर यांनी कमाई केलीच आहे. म्हणजे मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या किरणांनी राजकर्त्यांना प्रकाशमान केले आहे. या चित्रपटसृष्टीच्या गळ्यास नख लावण्याचे प्रयत्न सुरु असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज यांनी त्यांच्या राज्यात फिल्मसिटी उभारली जाईल व आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु होईल. पुढच्या दोन-अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल”, असंही अग्रलेखात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.