संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक, उद्याच मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचं आवाहन केलं आहे (Sangali Band against Sanjay Ruat).

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 16:08 PM, 16 Jan 2020
संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक, उद्याच मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा

सांगली :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे (Sangali Band against Sanjay Raut). महत्त्वाचं म्हणजे उद्याच (17 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आहेत.  “संजय राऊतांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील” असं संभाजी भिडे म्हणाले (Sangali Band against Sanjay Raut). संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही संभजी भिडे यांनी दिला.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावर टीका करत उदयनराजेंना सवाल केले होते. त्यावेळी उदयनराजेंनी थेट शिवसेनेला लक्ष करत शिवसेना नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का, असा प्रतिसवाल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वांचा अधिकार आहे. कुणा एकाची ती मक्तेदारी नाही असं म्हणत उदयनराजेंना वंशज असल्याचे पुरावे दाखवा, असं म्हटलं. यानंतर हा वाद वाढला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असा खोचक सल्लाही उदयनराजे यांनी शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, उदयनराजेंनी शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं होतं का असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही.”

संबंधित बातम्या :

उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत

शिवसेनेच्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यापूर्वी कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी चर्चा करा, संजय राऊतांचा सल्ला