मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आदित्यनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा : संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारला 7 मार्च रोजी 100 दिवस पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत Sanjay Raut meets Yogi Adityanath

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आदित्यनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा : संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आदित्यनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी ट्विटरवरुन दिली. (Sanjay Raut meets Yogi Adityanath)

सात मार्चला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या प्रस्तावित दौऱ्याबाबत आदित्यनाथ यांची भेट घेतली. अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरण चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. भेटीचा फोटो ट्वीट करत राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. “मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरुन भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्येला येऊ देणार नाही” असा इशारा त्यांनी दिला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अयोध्येत मोठा पोलिस बंदोबस्त असेल.

महाविकास आघाडी सरकारला 7 मार्च रोजी 100 दिवस पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा मुहूर्त निवडत अयोध्या दौरा आखला आहे. यावेळी शिवसेनेकडून अयोध्येमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?

उद्धव ठाकरे शनिवार सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामलल्लांचे दर्शन घेतील. संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती करतील, असे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्तेही अयोध्येला जाणार आहेत. (Sanjay Raut meets Yogi Adityanath)

हेही वाचा : बू आझमींच्या सुपुत्राची घोषणा, उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार, “तुम्ही राम मंदिरा बांधा, आम्ही मशीद उभारु”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI