AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू फडफड करतायत; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी फडफड करत आहेत. | Sanjay Raut

एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू फडफड करतायत; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Nov 13, 2020 | 2:54 PM
Share

मुंबई: अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात आर्थिक हितसंबंध होते. त्यांच्यात जमिनीचा व्यवहार झाला होता, असा गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलेच फटकारले आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी फडफड करत आहेत. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी कितीही फडफड केली तरी त्यामधून काही निष्पन्न होणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. (Shivsena leader Sanjay Raut slams BJP leader Kirit Somaiya)

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि राम कदम यांनी शिवसेनेविरोधात आघाडी उघडली आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे घराणे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक आत्महत्येबाबत बोलत नाहीत, मराठी भगिनीच कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत.

ठाकरे घराण्याने 21 जमिनी खरेदी केल्या हे त्यांचे आरोप खोटे आहेत. त्यांनी या व्यवहारांचा पुरावा आणून दाखवावा. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात झालेला जमिनीचा व्यवहार हा कायद्याच्या चौकटीत राहून केलेला व्यवहार आहे. परंतु, महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते विनाकारण फालतू आरोप करत आहेत. या प्रकरणात ‘ईडी’ची चौकशी करण्याचा काय संबंध आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

किरीट सोमय्या रोज सकाळी आरशात स्वत:चा चेहरा बघितल्यानंतही भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील. भाजपचे नेते एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुरुंगात जातात. तो तुमचा कोण लागतो, असे राऊतांनी भाजप नेत्यांना विचारले. तसेच किरीट सोमय्या यांनी कितीही फडफड केली तरी त्यामधून काहीही निष्पन्न होणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

‘ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू’ ईडीचे मालक दिल्लीत बसले आहेत, तेच आहेत, तेही व्यापारी आहेत. मात्र या व्यापारांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू, अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली.

डी, सीबीआय, इंटरपोलकडे, सीआय, केजी, युनोकडे जा किंवा इतर कुठेही जा, ते स्वत: भ्रष्टाचारी आहे. त्यांच्या तोंडाला शेणाचा वास येतो आहे, ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेत असल्याचा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

‘शेठजींच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना मराठी माणसाची प्रगती पाहवत नाही’ ठाकरे घराण्यावर आरोप करणारे लोक बनावट, ढोंगी आणि व्यापारी वृत्तीचे आहेत. मराठी माणसाची प्रगती त्यांना पाहवत नाही. त्यामुळेच आम्ही या व्यापाऱ्यांना आणि दलालांना घरी बसवले, अशी टीका संजय राऊत यांनी सोमय्यांवर केली.

‘किरीट सोमय्या हा गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडतोय’ किरीट सोमय्या हा गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडत आहे. ही त्याला शेवटची वॉर्निंग आहे. तुम्ही काहीही करा हे सरकार पाच वर्षे चालणारच. अशा सवयींमुळेच तुम्हाला पाच वर्षे घरी बसवले. आता तुम्ही कितीही फडफड केली तरी त्यामधून काहीही निष्पन्न होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

Special Report | ‘रश्मी ठाकरे-नाईक कुटुंबियांमध्ये जमिनीचा व्यवहार’ : किरीट सोमय्या

अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्यांचा मारेकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न : अनिल परब

(Shivsena leader Sanjay Raut slams BJP leader Kirit Somaiya)

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.