Corona | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत जमावबंदी, पुण्यात काय स्थिती?

संपूर्ण महाराष्ट्रात आज सकाळी 5 ते 31 मार्चपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली.

Corona | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत जमावबंदी, पुण्यात काय स्थिती?
Nupur Chilkulwar

|

Mar 23, 2020 | 9:14 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर (Pune Situation During Section 144) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लागू करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज सकाळी 5 ते 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली. या दरम्यान 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. या आदेशानंतर नेहमी गजबलेलं असणारं पुणे ओस पडलं.

“पुणेकरांनो, तुम्ही  #JantaCurfew ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 23 मार्च 2020 सकाळी 5.01 ते 31 मार्च 2020 मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. आपण आतापर्यंत देत आलेल्या सहकार्यची अपेक्षा आम्ही करतो”, असं ट्विट करत पुणे पोलिसांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. 

जनता संचारबंदीला पुणेकरांचा प्रतिसाद

जनता संचारबंदीला पुणेकरांचा पूर्ण प्रतिसाद मिळाला. रेल्वे, एसटी पीएमपी ठप्प, लोणावळा लोकलही रिकाम्या धावल्या. सकाळी मार्गावर असलेल्या पीएमपीच्या काही बस दुपारनंतर आगारात स्थिरावल्या तर एसटीची एकही बस मार्गावर धावली नाही.

रेल्वेच्या तर, लोणावळा लोकलही रिकाम्या (Pune Situation During Section 144) धावल्या, तर निम्म्या विमानांचे उड्डाणच झाले नाही. रविवारी विमानतळावर 40 विमानं उतरली आणि चाळीस विमानांनी उड्डाण केलं. मात्र, प्रवासी संख्या दोन हजार पेक्षा कमी असल्याची नोंद करण्यात आली.

मार्केट यार्ड तीन दिवसांनंतर सुरु

मार्केट यार्ड बंदने सात ते आठ कोटींचा व्यापार ठप्प पडला. सोमवारी मार्केट यार्ड सुरु राहाणार आहे. कोरोनाबाबत काळजी घेणार असून मार्केट यार्ज परिसरात हात धुण्यासाठी पाणी आणि सॅनिटायझर ठेवणार असल्याचं सांगितलं. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांना मास्क वाटप करणार आहेत. तसेच, प्रत्येक प्रवेशद्वारावर हात धुण्यासाठी पाणी, लिक्विड सोप आणि सॅनिटायझर ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. रविवारी मार्केटची औषध फवारणी करुन स्वच्छता करण्यात आली.

पुणे मार्केट यार्ड तीन दिवसानंतर पुन्हा सुर करण्यात आलं. मार्केट यार्डला भाजीपाला फळांची आवक नेहमीप्रमाणे सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून मार्केटयार्ड बंद होतं. शुक्रवारी आणि शनिवारी अडते असोसिएशनचा बंद होता. तर रविवारी जनता कर्फ्यूमूळे मार्केट बंद होतं. सलग तीन दिवसाच्या बंदनंतर चौथ्या दिवशी मार्केट सुरु झाल्याने शेतकरी खरेदीदार आणि विक्रेते यांची गर्दी झाली होती.

मात्र नेहमीच्या तुलनेत आवक कमी झाली. बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात कमी आणला. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची भीती असताना अनेक नागरिक (Pune Situation During Section 144) विना मास्क सुरक्षेची काळजी न घेता मार्केट यार्डला येत असल्याचंही पाहायला मिळालं.

मुखयमंत्री काय म्हणाले?

“उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

“उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“सरकारी कर्मचारी संख्या 25 वरुन 5 टक्क्यांवर आणली आहे. केवळ 5 टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरं, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू (CM Uddhav Thackeray On Corona) नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘कोरोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला, परदेशी न जाताच महिलेला लागण, चार नातेवाईकही बाधित

लोकल बंद ते जमावबंदी, तुमच्या आयुष्यात आजपासून काय बदल?

कोरोनाला रोखण्यासाठी देश सज्ज, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन

Pune Corona Virus | पुण्यात 15 जण कोरोनाबाधित, 876 लोक क्वारंटाईन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें