सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा

नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेतील घटकात समावेश करण्यात येणार (Security guards-Mathadi workers get 50 lakh insurance) आहे.

सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 9:04 PM

मुंबई : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेतील घटकात समावेश करण्यात येणार आहे. तसेच ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली. लवकरच याबाबतचा निर्णयही जारी केला जाईल, असेही ते म्हणाले. (Security guards and Mathadi workers Include essential  service get 50 lakh insurance)

या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होईल. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून त्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल.

अत्यावश्यक सेवेतील घटकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे अशी मागणी कामगार संघटनेद्वारे करण्यात येत होती. त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

यानुसार कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक तसेच माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार हे अत्यावश्यक सेवा देत आहे. त्यांना वित्त विभागाच्या 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करावे, याबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार यांचा जरी कोरोनालढ्यात थेट समावेश होत नसला तरी सदर यंत्रणेस मदत, सहकार्य व त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार करत आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार यांना विमा कवच आणि सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय सरकारच्यावतीने घेण्यात आला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर 50 लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

28 हजारांहून जास्त माथाडी कामगारांना निर्णय लागू   

‘महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ ’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतूदीनुसार राज्यामध्ये 36 माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही.

सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक आहे. सद्य:स्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या इत्यादी ठिकाणी 28 हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत.

या पुरवठा साखळीत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे.

15 सुरक्षारक्षक मंडळाना लाभ

राज्यात एकूण 15 सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षा रक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हील हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत.

केंद्र शासनाने 23 मार्च 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार ‘सुरक्षा रक्षकांची सेवा’ ही अत्यावश्यक सेवा जाहीर करुन या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडून सादर करण्यात आला होता. (Security guards and Mathadi workers Include essential  service get 50 lakh insurance)

संबंधित बातम्या : 

Maha Job App | मुख्यमंत्र्यांकडून ‘महाजॉब्स’ ॲप लाँच, Log in कसे कराल?

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.