सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, शरद पवारांचे आवाहन

सामाजिक दायित्व म्हणून सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे" असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, शरद पवारांचे आवाहन
अनिश बेंद्रे

|

Aug 10, 2020 | 10:09 AM

कराड : सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. कराडमध्ये सातारा-कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवार बोलत होते. (Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals)

“कोरोनाचे संकट हे अख्ख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहेत. पण सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एखाद्या छोट्याश्या अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

“कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, आपले राज्य नक्की कोरोनामुक्त होईल” असा विश्वास शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.

हेही वाचा : तीन दिवसात अंत्यविधी उरकले, आईचं दु:ख मागे सारुन पुन्हा मैदानात, राजेश टोपेंचा झंझावात

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात केली आहे. या जागांसाठी मुलाखत नसेल, पण मेरिटवर भरती करत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. मात्र ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals)

कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (9 ऑगस्ट) कोरोना आढावा बैठक पार पडली. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या, याबाबत माहिती दिली. राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही, असंदेखील राजेश टोपेंनी यावेळी स्पष्ट केलं.

“कोल्हापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 9 ते 10 दिवसांचा आहे. कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट हा 35 टक्के आहे तो पाच टक्क्यांवर आणायचा आहे. ग्रोथ रेट वाढतोय. बाहेरच्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी होतोय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याती गरज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

संबंधित बातमी :

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

(Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें