शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

शरद पवार उद्या (9 जून) रायगड जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती जाणून घेतील (Sharad Pawar will visit to Konkan).

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने रायगड, कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे (Sharad Pawar will visit to Konkan). काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत (Sharad Pawar will visit to Konkan).

शरद पवार उद्या (9 जून) रायगड जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती जाणून घेतील. त्यानंतर 10 जून रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही मंत्रीसुद्धा असतील.

दरम्यान, हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन कश्याप्रकारे मदत करता येईल यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला परत येताच त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं? तसेच कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद? मग फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करा, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नंबर शेअर

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

Published On - 3:03 pm, Mon, 8 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI