शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड रद्द, 35 वर्षांची परंपरा खंडित; कोरोना वाढल्याने घेतला निर्णय!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सांगली जिल्ह्यातून निघणारी शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड रद्द करण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड रद्द, 35 वर्षांची परंपरा खंडित; कोरोना वाढल्याने घेतला निर्णय!

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सांगली जिल्ह्यातून निघणारी शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड रद्द करण्यात आली आहे. पहिल्यांदाच ही दौड रद्द करण्यात आल्याने दुर्गा माता दौड निघण्याची गेल्या 35 वर्षांची परंपरा यामुळे खंडित होणार आहे. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी निघणाऱ्या दुर्गा माता दौडमध्ये राज्यातील विविध भागातील हजारो भाविक सहभागी होतात. गणपती उठल्यानंतर भाविकांना आस लागते ती म्हणजे दुर्गा माता दौडची मात्र, या वर्षी कोरोनामुळे दुर्गा माता दौड न काढण्याचा शिवप्रतिष्ठानने निर्णय घेतल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.(Shiv Pratishthan’s Durga Mata Daud cancelled, 35-year tradition broken; Decided to grow corona)

यंदाची दुर्गा माता दौड रद्द करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही. त्यामुळे यंदा दुर्गा माता दौड न घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचंही चौगुले यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून काही ठिकाणी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आरोग्य प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे राज्यात सर्व खबरदारी घेत हळूहळू लॉकडाऊनचे सर्व नियम शिथिल करण्यात येत आहेत. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे. हॉटेलसह सर्वच व्यवहार अटी-शर्थींवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप धार्मिकस्थळे खुली करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. यासाठी भाजपने ‘मंदिर उघडा’ हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते यांनी आंदोलन केले होते. तर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्नही भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाल्याने भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शिवाय, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थित सिद्धविनायक मंदिराबाहेर सिद्धिविनायकाच्या प्रतिकृतीची पूजा करून आरतीही घेण्यात आली होती.

सांगलीमध्येही गणपती मंदिरासमोर टाळ-मृदंग वाजवून आंदोनलान करण्यात आले. कोल्हापुरात शेष नारायण मंदिराबाहेर निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने हॉटेल, बार, मॉल सुरु केले मात्र, मंदिर बंद ठेवल्याने भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?

भिडे कुठे आहेत? माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

(Shiv Pratishthan’s Durga Mata Daud cancelled, 35-year tradition broken; Decided to grow corona)

Published On - 1:20 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI