भिडे कुठे आहेत? माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत

आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल.

भिडे कुठे आहेत? माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 1:54 PM

मुंबई: प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut take on Sambhaji Bhide)

संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना चिमटा काढला. यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे आता संभाजी भिडे या टीकेला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या:

संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण उद्धवराव, राऊतांना हटवा : संभाजी भिडे

उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन करणार नाही : संभाजीराजे

(Sanjay Raut take on Sambhaji Bhide)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.