45 खोल्यांचे अलिशान हॉटेल कोरोनाशी लढा देणाऱ्यांना खुलं, सोलापूरच्या शिवसेना नगरसेवकाची दानत

सोलापूरमध्ये एका तरुण नगरसेवकाने कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थेट आपलं आलिशान हॉटेल देऊ केलं आहे (Shivsena Corporator give hotels amid corona).

45 खोल्यांचे अलिशान हॉटेल कोरोनाशी लढा देणाऱ्यांना खुलं, सोलापूरच्या शिवसेना नगरसेवकाची दानत
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 18, 2020 | 2:18 PM

सोलापूर : सध्या जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील अधिकारी रात्रीचा दिवस करत आहेत. अशावेळी समाजातील इतर लोकही त्यांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. सोलापूरमध्ये एका तरुण नगरसेवकाने कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थेट आपलं आलिशान हॉटेल देऊ केलं आहे (Shivsena Corporator give hotels amid corona). देवेंद्र कोठे असं या शिवसेनेच्या तरुण नगरसेवकाचं नाव आहे.

देवेंद्र कोठे यांचं सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राधेकृष्ण नावाचं 45 रुमचं आलिशान हॉटेल आहे. हे हॉटेल त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खुलं केलं आहे. यासाठी त्यांनी हॉटेल ताब्यात घेण्याची विनंती करणारं पत्र प्रशासनाला दिलं आहे. त्यांच्या या पुढाकाराने आणि प्रशासनाला दिलेल्या मदतीने त्यांचं सोलापूरमध्ये चांगलंच कौतुक होत आहे. देवेंद्र कोठे यांनी या व्यतिरिक्त त्यांच्या प्रभागातील 2 हजाराहून अधिक जणांना या आधीच घरपोच धान्य देखील दिले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना लॉकडाऊनच्या या काळात तग धरुन राहण्यास मदत झाली.

आपल्या या मदतीची माहिती देताना देवेंद्र कोठे म्हणाले, “कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलिस प्रशासन, महापालिका किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी काम करत आहेत. ते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून कोरोना संसर्ग थांबवत आहेत. त्यांना आपलं कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी जाण्यासाठी भीती वाटत आहे. अनेकांच्या घरात लहान मुलं आणि ज्येष्ठ लोकं आहेत. त्यांना संसर्ग होईल, अशी काळजी त्यांना असते. भारतात अशी अनेक प्रकरणं देखील घडली आहेत ज्यात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणूनच मी माझे सोलापूरमधील स्वमालकीचे हॉटेल श्रीकृष्णा आणि हॉटेल राधेकृष्णा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रशासनाकडे सुपुर्द केले आहे. यासाठी मी कोणतंही शुल्क घेतलं नाही. तसेच पत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांना हॉटेलचा ताबा घेण्याची विनंती केली आहे.”

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाशी सामना करण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. याआधी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी देखील आपले हॉटेल याच कामासाठी देऊ केलं होतं.

Shivsena Corporator give hotels amid corona

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें