AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साकारला महाराष्ट्राचा नकाशा, शहीद जवानांना अनोखी आदरांजली

कळसुबाई शिखरावर तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा साकारून शहीद जवानांना वाहण्यात आली. Bhairvanath Group Tribute Martyr

कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साकारला महाराष्ट्राचा नकाशा, शहीद जवानांना अनोखी आदरांजली
Bhairvanath Group Tribute martyr
| Updated on: Nov 26, 2020 | 11:32 AM
Share

सातारा: जिल्हयातील लोणंद येथील ‘श्री भैरवनाथ डोंगर’ या ग्रुपने शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना आदरांजली देण्यासाठी थेट महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर जाण्याचा निर्णय घेतला.  ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली. ( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)

सातारा येथील लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीच्या कळसुबाई शिखर मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे साठ सदस्य कळसुबाई शिखरावर दाखल झाले. ग्रुपच्या सदस्यांनी 321 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाद्वारे महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी मानवंदना दिली. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अनोख्या मार्गांने आदरांजली वाहिल्याबद्दल भैरवनाथ ग्रुपचं कौतुक करण्यात येत आहे.

5 ते 65 वर्षापर्यंतच्या वयोगटातील सदस्यांचा सहभाग

श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांमध्ये 5 वर्षाच्या मुलांपासून 65 वर्षापर्यंतच्या वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. ग्रुपच्या सर्व साठ सदस्यांनी कळसुबाई शिखर यशस्वी सर केले. तिरंग्यातून महाराष्ट्रचा नकाशा सर्वोच शिखरावर साकारण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कळसुबाई शिखरावर जाऊन तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राचा नकाशा करण्याची संकल्पना एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांनी मांडली होती. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)

भैरवनाथ डोंगर ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर हा उपक्रम राबवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली होती. कळसुबाई शिखरावर 321 फुटांच्या तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राच्या नकाशाची प्रतिकृती बनवल्याचा अभिमान, असल्याचे शशिकांत जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. कोल्हापूरच्या निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील 21 नोव्हेंबरला, आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील ऋषीकेश जोंधळे हे 13 नोव्हेंबरला शहीद झाले होते. नागपूर जिल्ह्यातील काटोल गावातील भूषण सतई हे देखील पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते.

संबंधित बातम्या :

Sangram Patil Martyr | शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आठवडाभरात कोल्हापूरचे दोन जवान शहीद, दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी, सतेज पाटलांची घोषणा

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

( Shree Bhairvanath Dongar Group gave tribute to Martyrs on Kalasubai Peak)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.