आठवडाभरात कोल्हापूरचे दोन जवान शहीद, दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी, सतेज पाटलांची घोषणा

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापुरातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार ( kolhapur Jawans Martyred)

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 11:21 AM, 23 Nov 2020

कोल्हापूर: जिल्ह्यातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे (Rushikesh Jondhale) आणि संग्राम पाटील (Sangram Patil) यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. (Two Kolhapur Jawans Martyred Within a Week, 1 Crore Each To Both Families, Says Satej Patil)

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील (Martyr Sangram Patil) यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जात आहेत. संग्राम पाटील याचं पार्थिव कोल्हापुरातील निगवे खालसा गावात दाखल झाले. गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. दरम्यान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी निगवे खालसा गावाला भेट दिली. यावेळी मुश्रीफ यांनी शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले.

शहिदांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला- हसन मुश्रीफ

शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्यामागे आई- वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिंमत परमेश्वराने पाटील कुटुंबियांना द्यावी, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो, असं फेसबुक पोस्ट करत हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. (Two Kolhapur Jawans Martyred Within a Week, 1 Crore Each To Both Families, Says Satej Patil)

पाटील परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. पाटील कुटुंबियांच्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच. परंतु मी आज वर्तमानपत्रात वाचले की शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन. तसेच सोमवारी सकाळी अलोट गर्दीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी संयम पाळून अखेरची मानवंदना द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

तर गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात  महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. 16 नोव्हेंबर रोजी त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कारापूर्वी जोंधळे यांच्या बहिणीने त्यांना अखेरचं ओवाळलं. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.


अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण
ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.

(Two Kolhapur Jawans Martyred Within a Week, 1 Crore Each To Both Families, Says Satej Patil)

इतर बातम्या – 

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

अखेरची भाऊबीज! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळले, शोकाकुल वातावरणात निरोप