नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, कोकणातील वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन आणि केशार्पणही

बबन राणेंनी गोपिका गावडे यांच्यावर अंत्यसंस्कार केलेच, पण आपल्याच घरातील कार्य समजून अस्थी विसर्जन, पिंडदान, केशार्पण हे विधीही केले. (Sindhudurg Old Lady Last rites by Neighbors)

नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, कोकणातील वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन आणि केशार्पणही
प्रातिनिधिक फोटो

सिंधुदुर्ग : लॉकडाऊनमुळे मुलगा-सून बाहेरगावी अडकल्याने सिंधुदुर्गात वृद्धेवर गावकऱ्याने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्याच घरातील समजून त्यांनी अस्थी विसर्जन, पिंडदान आणि केशार्पण विधीही केले. (Sindhudurg Old Lady Last rites by Neighbors)

संकटकाळात माणुसकीचा धर्म अधोरेखित करणारी कहाणी सिंधुदुर्गात घडली आहे. बांदा-इन्सुली भागात राहणाऱ्या गोपिका गोपाळ गावडे या वृद्धेचे निधन झाले. 88 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गोपिका यांचे पुत्र केशव सध्या दक्षिण आफ्रिकेत राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांना अंत्यसंस्कार करण्यास येणे शक्य नव्हते. तर त्यांचा नातू आणि सून मुंबईजवळच्या डोंबिवलीत आहेत. रेड झोनमध्ये असलेल्या या भागातून त्यांनाही अंत्यसंस्कार करण्यास येणे शक्य नव्हते.

हेही वाचा : ‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य, आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

गोपिका गावडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोण करणार? असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. सर्वांच्या मदतीला जाणारे गावातील पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे धावून आले. (Sindhudurg Old Lady Last rites by Neighbors)

राणेंनी गावडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. इतकंच नाही, तर ते आपल्याच घरातील कार्य समजून अस्थी विसर्जन, पिंडदान, केशार्पण हे विधीही केले. राणे यांच्या या माणुसकीच्या धर्माने गावकरीही गहिवरुन गेले.

हेही वाचा : लॉकडाऊनमुळे तीन मुलं परराज्यात, सोलापुरात वृद्धेचा पतीला मुखाग्नी

तीन मुलं लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्यामुळे सोलापुरात राहणाऱ्या वृद्धेने पतीला मुखाग्नी दिल्याची घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. 75 वर्षीय व्यक्तीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. तेलंगाणामध्ये सलून सांभाळणारी त्यांची तिन्ही मुलं तिथेच अडकली. अखेर त्यांच्या 70 वर्षीय पत्नीनेच आपल्या वृद्ध पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

(Sindhudurg Old Lady Last rites by Neighbors)

Published On - 12:20 pm, Mon, 27 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI