AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत बेस्टच्या दिमतीला आलेल्या सोलापुरातील 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, उपचार सुरू

सोलापुरातील तब्बल 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. (Solapur 81 ST Worker Tested Corona Positive)

मुंबईत बेस्टच्या दिमतीला आलेल्या सोलापुरातील 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, उपचार सुरू
| Updated on: Oct 29, 2020 | 1:16 PM
Share

सोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगलीनंतर आता सोलापुरातील तब्बल 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट बस सेवेसाठी काही कमर्चारी मुंबईला गेले होते. तिथून परतल्यानंतरच या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. (Solapur 81 ST Worker Tested Corona Positive)

मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी गेले होते. काही दिवसांपूर्वी ते सर्व कर्मचारी सोलापुरात परतले. त्यानंतर त्यातील काही जणांना ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

या चाचणीत तब्बल 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी  सांगली जिल्ह्यातील तब्बल 106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे कर्मचारीही बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला गेले होते. मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सांगलीतून 200 चालक, 200 वाहक आणि इतर 25 असे एकूण 425 कर्मचारी मुंबईला गेले होते. दहा दिवसांची सेवा दिल्यानंतर ते सांगलीत परतल्यानतंर त्यांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांमध्ये सांगली 6, मिरज 6, इस्लामपूर 6, विटा 14, आटपाडी 15, जत 15, कवठेमहांकाळ 14, तासगाव 24 आणि शिराळा विभागातील 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Solapur 81 ST Worker Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा

Sangli Corona : सांगलीने करुन दाखवलं, एकाच कुटुंबातील 25 रुग्ण कोरोनामुक्त

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.