AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विचार स्वातंत्र्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला

विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल. विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही

विचार स्वातंत्र्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 14, 2021 | 6:17 PM
Share

पुणे – अभिनेते विक्रम गोखल्याच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी शिवसेना – भाजपने एकत्र यांनी सर्वकाही विसरून पुन्हा एकत्र यावे अशी भावनाही व्यक्त केली आहे. इतकच नव्हे तर कंगना राणावने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचेही गोखलेंनी समर्थन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं गोखल्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गोखलेंनी ही वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी गोखलेंना उत्तर दिले आहे.

राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा

”विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल.”

”विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही. रक्तरंजित क्रांती झाली नाही हेच या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.” अशी विधाने करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

या प्रकारचे वक्तव्य करणे हा सैनिकाचा अपमान ज्या लोकांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे अशी विधाने केली जातात . परंतु अशा व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या शब्दात त्यांनी कंगना राणावतचा खरपूस समाचार घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यासाठीची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडून पसरवली जात आहे. असेही ते म्हणाले.

समाजात दुही निर्माण करणाऱ्यांचा शोध घ्या हिंदुत्व हि पॉलिटिकल फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे..या तत्वज्ञानाबद्दल अशा प्रकारची लोक समोर येऊन समाजात दुही निर्माण करण्याचा , फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेबद्दल अनादर करणारे उद्गार काढले नव्हते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन कोण देतो याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले

हेही वाचा:

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

Follow Us
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...