नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलाची आत्महत्या

आईला कोरोना झाल्याचं समजल्यानंतर 23 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Son suicide corona infection to mother in Nashik).

नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलाची आत्महत्या

नाशिक : आईला कोरोना झाल्याचं समजल्यानंतर 23 वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Son suicide corona infection to mother in Nashik). नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा दुर्दैवी प्रकार घडला. संबंधित महिलेवर मागील काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. उपनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरु होते. 23 वर्षीय मुलाला आपल्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. यानंतर त्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तात्काळ पाचारण केले. उपनगर पोलीस सध्या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आईला कोरोना झाल्याचं समल्यानंतर आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्येनंतर या भागात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेच्या इतर बाजूही तपासत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरु आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. नाशिक शहरात 407, तर ग्रामीण भागात 181 रुग्ण आढळले, तर जिल्ह्यात एकूण 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण मृतांचा आकडा 371 पर्यंत पोहचला आहे. नाशिक शहरातील बाधितांची संख्या 5 हजार 241 वर पोहचली. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 हजार 682 वर गेला.

शुक्रवारी दिवसभरात उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत 2 हजार 588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ:


हेही वाचा :

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

औरंगाबादमध्ये प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट होणार, टेस्ट न केल्यास दुकान उघडण्यास बंदी

कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774

Son suicide corona infection to mother in Nashik

Published On - 10:17 am, Sat, 18 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI