5

चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर

जगातील तिसऱ्या मोठ्या महासागरात म्हणजे हिंदमहासागरात चीन भारताविरोधात नवा कट रचत आहे. (India China Sea War and Pakistan).

चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 6:58 PM

मुंबई : जगातील तिसरा मोठा महासागर म्हणजे हिंदमहासागर. 70 लाख 56 हजार किलोमीटर लांब असलेल्या याच हिंदमहासागरात चीन भारताविरोधात नवा कट शिजवतोय (India China Sea War and Pakistan). चीनच्या या कटाची खलबतं थेट पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराची बंदरात सुरु आहेत. या दोन्ही बंदरांवरुनच चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात दुहेरी युद्ध छेडण्याच्या विचारात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

जमिनीवर भारतीय जवानांनी चिनी ड्रॅगनचे दात त्यांच्याच घशात घातले. त्यामुळे लडाखमध्ये चर्चेचं सोंग आणून चीननं पाण्याद्वारे डिवचण्याची कारस्थानं सुरु केली आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल खेळलीय. त्यामुळे समुद्रात चीनला पाकिस्तानच्या बंदराचं बळ मिळणार आहे, असं मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चीनला समुद्रात मर्यादा आहेत. समुद्रातील युद्धात संख्याबळापेक्षा भौगोलिक रचनेला जास्त महत्व असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये भारतीय नौदल चीनपेक्षा सरस मानलं जातं. समुद्रात एकट्याच्या जीवावर भारताविरोधात लढणं चीनला परवडणार नाही. म्हणून पाकिस्तानला हाताशी धरुन अरबी समुद्रात चिनी सरकारनं नेव्ही बेसची शोधाशोध सुरु केलीय. याआधीपासून पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराचीत चीनचे बेस आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

2017 मध्ये चीननं आफ्रिका खंडातील जिबुतीमध्ये पहिला हायटेक बेस बनवला होता. तसाच हायटेक बेस चीनला हिंद महासागरातील IOR मध्ये बनवायचा आहे. IOR हा पाकिस्तानचं ग्वादर आणि कराची बंदर यांच्या अत्यंत जवळचा भाग आहे. या ठिकाणामुळे चीनी पाणबुड्या आणि जहाजांना भारताजवळ येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, चीनच्या या चालबाजीवर भारताकडेही चोख उत्तर आहे.

आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये चिनी वस्तू या दक्षिण चिनी समुद्रातून पोहोचतात. भारतानं जर मनात घेतलं, तर मलाका स्ट्रेटद्वारे भारत या मार्गात अनेक अडथळे आणू शकतो. मात्र, फक्त आत्ताच नाही, तर भविष्यात सुद्धा भारताला सतर्क राहावं लागणार आहे. कारण, चीन-पाकिस्तानात होत असलेले करार हे पुढच्या काळात भारताबाबत चिंतेचे विषय ठरु शकतात.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

चीन 2021 पर्यंत पाकिस्तानला आधुनिक पाणबुड्या देणार आहे. चीन-पाकिस्तानमध्ये 7 बिलियन डॉलरचा करार सुद्धा झालाय. पाकिस्तानच्या नौदलाला चीन आधुनिक शस्रं सुद्धा देणार आहे. आजही पाकिस्तानी सैन्याकडील एकूण शस्रांपैकी 70 टक्के शस्रं ही चीनची आहेत. आता चीन आणि पाकिस्तानच्या युतीवर भारत कशी मात करणार हे सुद्धा महत्वाचं आहे. भारतीय नौदल हे जगातलं चौथं मोठं नौदल आहे. तर पाकिस्तानी नौदलाचा जगात 13 वा क्रमांक लागतो.

भारतीय नौदलाकडे एकूण 295 आधुनिक जहाजं आहेत. तर पाकिस्तानच्या ताफ्यात एकूण 197 जहाजं आहेत. भारताकडे गस्त घालणारी जहाजांची संख्या 139 आहे. तर पाकिस्तानकडे फक्त 17 गस्त घालणारे जहाजं आहेत. यावरुन पाकिस्तानच्या नेव्हीला हायटेक होण्यासाठी अजून बराच काळ लागणार असल्याचं स्पष्ट आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र ही उणीव लक्षात घेऊन चीन 2022 पर्यंत पाकिस्तानच्या नौदलाला बळकट करण्यासाठी झटतोय. त्यामुळे जमिनीबरोबरच आता समुद्रातही चीनवर कायम नजर ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा :

चीनला धूळ चारण्यासाठी जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांची एकी, समुद्रात युद्धाभ्यास होणार

China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

India China Sea War and Pakistan

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...