PUBG गेमसाठी दहावीच्या विद्यार्थ्याची 50 हजार रुपयांची चोरी

PUBG गेमसाठी दहावीच्या विद्यार्थ्याची 50 हजार रुपयांची चोरी

चंदीगढ : PUBG गेमचे सध्या अनेक तरुणांना व्यसन लागलं आहे. यामुळे आतापर्यंत अनेक धक्कादायक अशा घटनाही घडल्या आहेत. नुकतेच पंजाबमधील जालंधर शहरातील एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने PUBG गेमच्या व्यसनात चोरी केली आहे. विशेष म्हणजे ही चोरी त्याने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथे राहणाऱ्या या मुलाने पबजी कंट्रोलर, कस्टमाइज स्क्रीन, कॉस्ट्यूम खरेदी करण्यासाठी हे पैसे चोरल्याचे कबूल केलं आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने थेट वडिलांच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे.

वडिलांना न सांगता त्याने बँक खात्यातून तब्बल 50 हजार रुपये काढले आहेत. विशेष म्हणजे या मुलाने वडिलांच्या नकळत ही चोरी केली आहे. मात्र एक दिवस वडिलांनी बँक खात्याची डिटेल पाहिली तर त्यातून 50 हजार रुपये काढल्याचे दिसले. यामुळे त्यांनी थेट बँकेत धाव घेत या घटनेची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली. बँकेने सांगितले की, मला एकही ओटीपी, मेसेज आणि ट्रान्जॅक्शन आले नाही. 50 हजार रुपये अचानक गायब झाले आहेत.

पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता समजले हे पैसे पेटीएम अकाऊंटमधून ट्रान्सफर केले आहेत. यानंतर पोलिसांनी पेटीएम अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. तिथे त्यांना पैसे कुणी काढले याची संपूर्ण माहिती आणि घरचा पत्ता मिळाला. यानंतर अधिक चौकशी दरम्यान ही चोरी 10 वीच्या वर्गात शिकत असलेल्या आपल्या मुलाने केली आहे. पोलिसांनी जेव्हा याबद्दल मुलाला विचारले असता त्याने पैसे काढल्याचे कबूल केले. रात्री उशिरा ट्रॅन्जेक्शन केले आणि वडिलांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मेसेज डिलीट केला. मात्र मुलाचे नाव समोर आल्यावर वडिलांनी तक्रार मागे घेतली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI