उत्तर प्रदेश सीमेवर बच्चू कडू यांचा ताफा रोखला; यूपी पोलिसांची दडपशाही

उत्तर प्रदेश सीमेवर बच्चू कडू यांचा ताफा रोखला; यूपी पोलिसांची दडपशाही
bacchu kadu

केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले राज्याचे मंत्री बच्चू कडू यांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)

भीमराव गवळी

|

Dec 09, 2020 | 8:43 PM

भरतपूर: केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले राज्याचे मंत्री बच्चू कडू यांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. ही यूपी पोलिसांची दडपशाही असून आपण दिल्लीत जाऊ नये म्हणून चोहोबाजूंनी चक्काजाम करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यूपी पोलिसांनी अडवल्यामुळे बच्चू कडू यांना एका गुरुद्वारात मुक्काम करावा लागला आहे. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)

दिल्लीत भर थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्लीकडे निघाले असता त्यांचा ताफा यूपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखण्यात आला. ग्वाल्हेर येथून भरतपूर मार्गे पलवलला जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच यूपी पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे यूपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास सांगण्यात आले. परंतु, भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग यूपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने बच्चू कडू यांना भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला आहे.

गावकऱ्यांचा जोरदार पाठिंबा

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांना जागोजागी जबरदस्त समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना यूपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत. तरीही बच्चू कडू यांनी उत्तर प्रदेशात दाखल होत आज हजारो समर्थकांसह मथुरा – वृंदावनला मुक्काम केला. मात्र, आज त्यांचा मुक्काम भरतपूरला होणार असून उद्या गुरूवारी (ता.10) रोजी ते सकाळी हजारो समर्थकांचा ताफ्यासह पलवलच्या दिशेने रवाना होणार आहेत. (State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)

संबंधित बातम्या:

(State Minister Bacchu Kadu went to delhi for supporting farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें