मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं लागण्याची शक्यता आहे (Statement of neighbour of Sushant Singh Rajput). सुशांतच्या घरी 13 जूनला एक पार्टी झाल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात आला. मात्र, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार 13 जूनला सुशांतच्या घरातील लाईट लवकर बंद झाल्या होत्या. तसेच त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, अशी माहिती या महिलेने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयपुढे या प्रकरणाचा उलगडा करण्याचा नवं आव्हान आहे.