‘तब्लिग जमात’ कार्यक्रमातील 9 हजार लोक क्वारंटाईनमध्ये, 1306 विदेशी नागरिक : आरोग्य मंत्रालय

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 151 जण कोरोनामुक्त झाले आहे," अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Tablighi Jamaat people in quarantine) दिली.

‘तब्लिग जमात’ कार्यक्रमातील 9 हजार लोक क्वारंटाईनमध्ये, 1306 विदेशी नागरिक : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Tablighi Jamaat people in quarantine) आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल अॅप जारी केला आहे. ब्लु टूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित अॅप बनवण्यात आले आहे. यात इतरांबरोबरचा संपर्क लक्षात घेऊन किती धोका आहे, याचे मोजमाप या अॅपद्वारे होणार आहे.

“नवी दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात ‘तब्लिग जमात’चा (Tablighi Jamaat people in quarantine) धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित सुमारे 9000 लोकांना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. यात दिल्लीतील 2000 कार्यकर्त्यांपैकी 1804 जणांना विलगीकरण केंद्रात हलवण्यात आले आहे. तर यातील 334 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

“तसेच ‘तब्लिग जमात’चा कार्यक्रमाशी संबंधित लोकांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा काम सुरु आहे. अशा 400 व्यक्ती आढळल्या असून अतिरिक्त तपासणी सुरु आहे. त्यातून आणखी काही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता आहे.”

“सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे आदेश गृह सचिवांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी लॉक डाऊनच्या तरतुदींचा व्यापक प्रसार करावा,” असेही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

“या आपत्तीच्या काळात अचूक आणि अधिकृत माहितीचे महत्व लक्षात घेऊन कोरोनाबाबतच्या अधिकृत माहितीसाठी वेबपोर्टल निर्माण करण्याची गृह सचिवांनी केली आहे. त्यानुसार फॅक्टचेक युनिट हे लवकरात लवकर उभारले गेले पाहिजे,” असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

“कोरोनासंदर्भातल्या शंकांचे राज्य स्तरावर निरसन करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी अशीच यंत्रणा उभारण्याची गृह सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे,” असेही यावेळी संयुक्त सचिव म्हणाले.

“गेल्या 24 तासात आणखी 328 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशात एकूण 1965 कोरोनाबाधित रुग्ण आहे. यातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 151 जण कोरोनामुक्त झाले आहे,” अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

“डायलिसिस सुरू असलेल्या किडनी रुग्णांनी खबरदारी आणि काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आल्या आहेत.”

“वृद्ध आणि लहान मुले यांच्यामध्ये निर्माण झालेला ताण आणि चिंता कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे.”

“लॉकडाऊन सुरु झाल्यापासून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 352 रेल्वे डब्यातून 9.86 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वाहतूक केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत तसेच पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत अन्नधान्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही एफसीआय सज्ज आहे.”

“एकजूट हे आपले बळ, कोरोनाविरुद्धची लढाई आता सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिक, सरकारी कर्मचारी यांनी एखाद्या योध्याप्रमाणे हा लढा देण्याची गरज,” असेही आरोग्य मंत्रालयाने (Tablighi Jamaat people in quarantine) सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI