AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार

पावसामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झालेल्या प्रत्येक पीडित कुटुंबाला 10 हजार रुपये देण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. (Telangana CM K Chandrashekhar Rao announced 10 thousand rupees help to poor flood affected peoples)

तेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार
| Updated on: Oct 19, 2020 | 6:13 PM
Share

हैदराबाद : तेलंगणा राज्याला मागील आठवड्यात जोरदार पावसासह पुराचा फटका बसला होता. अतिवृष्टीमध्ये तेलंगणातील 70 नागरिकांना जीव गमवावा लागला. पावसामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झालेल्या प्रत्येक पीडित कुटुंबाला 10 हजार रुपये देण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. तेलंगणा सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 550 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. (Telangana CM K Chandrashekhar Rao announced 10 thousand rupees help to poor flood affected peoples)

पावसामुळे ज्यांच्या घराची संपूर्ण पडझड झाली त्यांना 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर, काही प्रमाणात नुकसान झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. हैदराबाद, रंगारेड्डी, मेडचल, मल्काजगिरी जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रस्ते आणि इतर पायाभूत सोयी सुविधांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याकामासाठी 550 कोटींच्या पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.  राज्यातील मंत्री, आमदार,  महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्वजण आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करत आहेत. सर्व  आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास सरकार तयार असल्याचे राव यांनी म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारने दिलेल्या मदतीमुळे आपत्तीग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी मदत होईल.

दरम्यान, हैदराबाद महापालिका क्षेत्रातील 33 तर इतर जिल्ह्यातील 37 जणांना जीव गमवावा लागला होता.  हैदराबादमध्ये गेल्या 100 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता, अशी माहिती देखील मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Donald Trump | ट्रम्पना कोरोना संसर्ग, तेलंगणातील चाहत्याला धक्का, ह्रदयविकारानं मृत्यू

तेलंगणात कॉंग्रेस आणि टीआरएसमध्ये चुरस

(Telangana CM K Chandrashekhar Rao announced 10 thousand rupees help to poor flood affected peoples)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.