AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो हे ही माहित असु द्या ! कसे होते पिकाचे सर्वेक्षण आणि राज्य सरकार यावर किती रुपये खर्ची करतेय

आता पर्यंत किड-रोग सर्वेक्षण आणि त्याचे व्यवस्थापन हा केवळ ऐकण्यारपुरता विषय राहिलेला आहे. पण आज आपण ही प्रक्रिया नेमकी असतेय कशी..सरकारने दिलेल्या निधीचे कसे विवरण होते हे जाणून घेणार आहोत. कृषी विभातील कृषी सहायकांना आठवड्यातील चार दिवस हे आपल्या भागातील पिकाचे सर्वेक्षण करावे लागते. य दरम्यान जी किड आढळून आली आहे त्याचा अहवाल हा विद्यापीठाकडे पाठविला जातो.

शेतकऱ्यांनो हे ही माहित असु द्या ! कसे होते पिकाचे सर्वेक्षण आणि राज्य सरकार यावर किती रुपये खर्ची करतेय
Sarve
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : आता पर्यंत किड-रोग सर्वेक्षण आणि त्याचे व्यवस्थापन हा केवळ ऐकण्यारपुरता विषय राहिलेला आहे. पण आज आपण ही प्रक्रिया नेमकी असतेय कशी..सरकारने दिलेल्या निधीचे कसे विवरण होते हे जाणून घेणार आहोत. कृषी विभातील कृषी सहायकांना आठवड्यातील चार दिवस हे आपल्या भागातील पिकाचे सर्वेक्षण करावे लागते. य दरम्यान जी किड आढळून आली आहे त्याचा अहवाल हा विद्यापीठाकडे पाठविला जातो.

किडीमुळे पिक जर नुकसान पातळीच्यावर गेले असेल तर तसा अहवाल हा संबंधित कृषी कार्यालयास दिला जातो. त्या अहवालानुसार कृषी सहायक, कृषी मंडळ पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी त्या गावात जातात आणि बैठका घेऊन प्रादुर्भाव झालेल्या रोगाविषयी माहिती सांगतात. एवढेच नाही तर त्या रोगराईप्रमाणे काय फवारणी या विषयी देखील शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो. काय फवारणी करायची याबाबत गावात फलकही लावले जातात. गरज पडली तर सबसिडीवर औषधेही शेकऱ्यांना पुरवली जातात.

खरीपातील पिकांची आणि फळबागांची स्थिती

वाढीव उत्पादनाच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार एक ना अनेक योजना राबवत आहे. एवढेच नाही तर चालू हंगामातील पिकांवरील किड आणि रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 7.5 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना खरीपातील पिकासह भाजीपाला आणि फळबागाकरिता सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्याअनुशंगाने सुचना देण्यात आल्या असून आता या उपक्रमाला केव्हा सुरवात होणार हे पहावे लागणार आहे. बदलत्या वातावरणानुसार पिकांवर, फळबागावर तसेच भाजीपाल्यावर हा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

पिकाबरोबर फळबागावरही प्रादुर्भाव

सध्या खरिपातील सोयाबीन कापूस काढणीच्या अवस्थेत आहेत. मात्र, मध्यंतरी झालेला पाऊस आणि आताचे ढगाळ वातावरण यामुळे किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे तर आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, चिक्कू, काजू या फळबागांची फळगळती ही होऊ लागली आहे. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या सर्वच बाबींवर सद्यस्थितीला किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव पाहवयात मिळत आहे. त्याअनुशंगाने आता कृषी विभागाला किड-रोग सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला द्यावा लागणार आहे. याकरीताच राज्य सरकारने तब्बल कोट्यावधी रुपये खर्ची केले आहेत. आता स्थानिक पातळीवर हा निधी कशा प्रकारे खर्ची केला जातो हे पाहणेही महत्वाचे आहे.

असा होतो शासन निधीचा उपयोग

राज्य सरकारने किड-रोगराई व्यवस्थापनासाठी 7.5 कोटींची तरतूद केली आहे. स्थानिक पातळीवर कृषी सहायक हे मोबाईलच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन त्याची माहिती ही विद्यापीठाला दिली जाते. या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या मोबाईल डाटासाठी या निधीचा वापर केला जातो. (The survey was conducted to survey the crop worth crores of rupees from the state government.)

संबंधित बातम्या :

फळगतीचा धोका ; फळबागांची अशी घ्या काळजी, सोशल मिडीयातील मॅसेज हे फसवे

टोमॅटोचा लाल चिखल, मिरची उपटून फेकली, पपईला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्याकडून रोटरने बाग उद्ध्वस्त

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ शेतकऱ्यांची हीताची मोठी घोषणा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.