नाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकमध्ये एका चोरट्याने थेट महादेवाच्या एका मंदिरात जाऊन चोरी केली (Theft in Temple Nashik) आहे. या घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सचिन पाटील

| Edited By: Namrata Patil

Jun 10, 2020 | 1:02 PM

नाशिक : नाशिकमध्ये एका चोरट्याने थेट महादेवाच्या एका मंदिरात जाऊन चोरी केली (Theft in Temple Nashik) आहे. या घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे या चोराने चोरीपूर्वी चप्पल बाहेर काढली. दरम्यान नाशिक पोलीस या चोराचा शोध घेत (Theft in Temple Nashik) आहे.

नाशिकमधील कृष्णनगरातील बेलसरे वाड्यात महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी चोरट्याने चप्पल बाहेर काढत शिवलिंगावर असलेला कळस, पिंडीवरील कवच, नाग, घंटी अशा तांब्या-पितळाच्या वस्तूंची चोरी झाली आहे. ही चोरी सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलीसही सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीमध्ये चोराने चोरी करण्यापूर्वी चक्क चप्पल काढली. त्यानंतर त्याने देवघरात प्रवेश केला आणि चोरी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. नाशिक पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वी हे लॉकडाऊन अनलॉक करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. लॉकडाऊनदरम्यान सर्व काही बंद असल्याने आर्थिक चणचणही निर्माण झाली. यामुळे चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या हॉलमधून 17 तोळे सोनं चोरीला, शिर्डीत धक्कादायक प्रकार

नाशिकमध्ये गॅस कटरने स्टेट बँकेचं एटीएम फोडलं, 4.75 लाखाची रोकड घेऊन चोरटे फरार

Unlock | मिशन बिगीननंतर नाशिकमधील बाजारात गर्दी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें