AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या हल्लेखोरांनी ऑनलाईन अ‍ॅसिड मागविले होते, फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाची नोटीस

मुलीच्या वडीलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीचा चेहरा व गळा आठ टक्के भाजला आहे. या प्रकरणात सचिन अरोरा आणि त्याचे दोन मित्र हरषित अग्रवाल (19 ) आणि वीरेंद्र सिंग (22 ) यांना अटक करण्यात आली आहे.

त्या हल्लेखोरांनी ऑनलाईन अ‍ॅसिड मागविले होते, फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाची नोटीस
acidImage Credit source: acid
| Updated on: Dec 15, 2022 | 6:59 PM
Share

दिल्ली : दिल्लीच्या द्वारका परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर बाईकवरुन आलेल्या दोघा तरूणांनी अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणात अ‍ॅसिडची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाने नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितले आहे.

दिल्ली येथील द्वारका परिसरात एका 17 वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पीडित मुलगी रस्त्याच्या कडेने चालत असताना समोरुन एका दुचाकीवर दोनजण आले. त्यांनी या मुलीजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी केला आणि त्याचवेळी मागे बसलेल्या व्यक्तीने या मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याने ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने कोणत्या सेलरने हे अॅसिड विकले, त्याची संपूर्ण माहिती मागवली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अॅसिडची सहज उपलब्धता ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे,” असे आयोगाने दोन कंपन्यांना पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रोडक्ट पोस्ट करण्याची परवानगी देण्यापूर्वी या कंपन्यांनी विक्रेत्याचा परवाना तपासला होता का आणि ज्यांनी ऑनलाइन ‘अॅसिड’ विकत घेतले त्यांचे फोटो आयडी घेतले होते का, असेही आयोगाने या नोटीसीत विचारले आहे. गव्हर्मंट रेग्युलेटेड प्रोडक्टच्या विक्रीबाबत प्लॅटफॉर्मद्वारे अवलंबण्यात येणारे धोरण, वेबसाइट्सवर ‘अॅसिड’ विक्रीस परवानगी देण्यास जबाबदार अधिकारी आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील देखील महिला आयोगाने मागितला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...