‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (PDP) 3 नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी दाखवत राजीनामे दिले आहेत.

'देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही', मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (PDP) 3 नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी दाखवत राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या PDP नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची कारणं सांगितली (Three leaders of PDP annoyed by Mehbooba Muftis statement resign).

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “PDP नेते टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन ए वफा यांनी पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. त्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की आम्ही तुमच्या काही कामांवर, वक्तव्यांवर नाराज आहोत. विशेष करुन देशभक्तीच्या भावनेचा अनादर केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्हाला असहज वाटत आहे.”

मेहबुबा मुफ्ती नेमक्या काय म्हणाल्या होत्या?

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या होत्या, “जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही.”

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “प्रत्येक काश्मिरी नागरिकाला कलम 370 (Article 370) पुन्हा आणण्यासाठी लढाई लढावी लागेल. काश्मिरी नागरिकांच्या हक्कावर 5 ऑगस्ट 2019 रोजी दरोडा टाकण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे कलम 370 हटवण्यात आलं. कलम 370 हटवण्यात आलेला हा दिवस काश्मीरसाठी काळा दिवस आहे.”

“मला तो दिवस दररोज आठवतो. मला विश्वास आहे की हीच स्थिती जम्मू काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाची असेल. त्या दिवशी झालेल्या अपमानाला आपण विसरु शकत नाही. रद्द केलेलं कलम 370 पुन्हा एकदा लागू करण्याचा निश्चय करावा लागणार आहे. त्यासोबतच काश्मीरचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे. हा मार्ग सोप नाही, मात्र आपण तो नक्कीच पूर्ण करु,” असंही मुफ्ती यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य, भाजपची अटकेची मागणी

मेहबुबा मुफ्तींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात युवक आक्रमक; निषेध नोंदवत मुफ्तींच्या कार्यालयासमोर फडकवला तिरंगा

‘कलम 370 हटवणे हा काश्मीरसाठी काळा दिवस’, सुटकेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Three leaders of PDP annoyed by Mehbooba Muftis statement resign

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI