मेहबुबा मुफ्तींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात युवक आक्रमक; निषेध नोंदवत मुफ्तींच्या कार्यालयासमोर फडकवला तिरंगा

पीडीपी (PDP) पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जम्मू काश्मीरमधील युवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. (youth protested against Mehbooba Mufti trying to hoist the tricolor)

मेहबुबा मुफ्तींच्या 'त्या' वक्तव्याविरोधात युवक आक्रमक; निषेध नोंदवत मुफ्तींच्या कार्यालयासमोर फडकवला तिरंगा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:26 AM

जम्मू : पीडीपी (PDP) पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जम्मू काश्मीरमधील युवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जम्मूमधील युवकांनी रविवारी पीडीपीच्या (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी) कार्यालयासमोर तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत मेहबुबा मुफ्तींविरोधात निषेध नोंदवला. (youth protested against Mehbooba Mufti trying to hoist the tricolor)

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी संवैधानिक बदल वापस घेतले जात नाहीत. तोपर्यंत भारतीय राष्ट्रध्वज उचलण्यात कुठलही स्वारस्य नाही असं वक्तव्य शुक्रवारी केलं होतं. तसेच निवडणूक लढण्यातही रस नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. तसेच त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. रविवारी (25 ऑक्टोबर) जम्मू येथील मेहबुबा मुफ्ती यांच्या कार्यालयासमोर काही युवकांनी तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच युकांनी मोर्चा काढत मेहबुबा मुफ्तींविरोधात निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केलां. पण परिस्थिती चिघळू नये म्हणून जम्मू पोलिसांनी या युवकांना रोखलं.

आम्ही राष्ट्रवादी आहोत, राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही

दरम्यान, समाजसेवक अमनदीप सिंह यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांनी सांगितलं की, “आम्ही राष्ट्रवादी आहोत. आम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत होतो. आम्हाला पोलिसांनी रोखलं. आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. पण आम्ही राष्ट्रवादी आहोत. तिरंगा आमचा गौरव आहे. आमचा सम्मान आहे. त्याचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही.” सध्या पोलिसांनी युवकांना पीडीपी कार्यालजवळून बाजूला केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अमनदीप सिंह यांनी शनिवारीदेखील पीडीपी कार्यालयासमोर भारतीय ध्वज फडकवला होता.

संबंधित बातम्या :

‘कलम 370 हटवणे हा काश्मीरसाठी काळा दिवस’, सुटकेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Article 370 : मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक, तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Jammu Kashmir | ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींसह प्रमुख नेते स्थानबद्ध, श्रीनगरमध्ये जमावबंदी

(youth protested against Mehbooba Mufti trying to hoist the tricolor)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.