Article 370 : मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक, तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

Article 370 : मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक, तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

श्रीनगर : गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी (5 ऑगस्ट) संसदेत कलम 370 हटवण्यासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करणारा ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आला. हा विधेयक मंजूर होताच राजकीय घडामोडींना वेग आला. या दरम्यान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना रविवारी रात्री उशीरा नजरकैदेत ठेवण्यात आले होते. राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या घरुन शासकीय विश्रामगृहात नेण्यात आलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याव्यतिरिक्त ओमर अब्दुल्ला आणि स्थानिक नेते सज्जाद लोन यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

काश्मीर खोऱ्यात कलम 370 हटवण्यावरुन कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्याला तैनात केलं आहे. तसेच, संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्याशिवाय, इंटरनेट आणि केबल टीव्ही नेटवर्कही बंद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Article 370 : मोदी सरकारने इतिहास-भूगोल बदलला, लक्षात ठेवण्यासारखे पाच मुद्दे

अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचं कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडताच मेहबुबा मुफ्ती यांनी याचा विरोध दर्शवला होता.

“आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे. आज ‘टू नेशन थ्योरी’ नाकारण्याचा 1947 च्या तत्कालीन जम्मू-काश्मीर सरकारचा निर्णय चुकीचा ठरला आहे. कलम 370  हटवण्याचा निर्णय हा पूर्णपणे अवैध आणि असंवैधानिक आहे”, असं ट्वीट केलं होतं.

अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीरबाबात दोन संकल्प आणि दोन विधेयकं सादर केली. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. यादरम्यान अमित शाहांनी जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयक सादर केलं. यानुसार जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळं केलं. लडाख हे विधानसभा नसलेलं, तर जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल. त्यानंतर संध्याकाळी उशिरा यावर मतदान घेण्यात आलं आणि त्यानंतर हे विधेयक संसदेत मंजूर झालं.

हेही वाचा : Article 370 हटवल्यानंतर मोदींचा जुना फोटो व्हायरल

जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घडामोडी

1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात

2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती

3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू

4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात

5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *