Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली.

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 7 करोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईचे 5 आणि पुण्यातील 2 जण आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. तर 6 जण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 5 रुग्णांमध्ये ( 71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2085 30 122
पुणे (शहर+ग्रामीण) 467 19 46
पिंपरी चिंचवड 37 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 125 3
नवी मुंबई 63 8 3
कल्याण डोंबिवली 68 2
उल्हासनगर 1
भिवंडी 1
मीरा भाईंदर 53 2
वसई विरार 61 1 3
पालघर 14 1
रायगड 8
पनवेल 28 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 8
मालेगाव 45 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 28 3 1
धुळे 1 1
जळगाव 2 1
सोलापूर 12 1
सातारा 7 2
कोल्हापूर 5 1
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 28 5 2
जालना 2
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 14 1
अमरावती 5 1
यवतमाळ 13 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 57 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 11 2
एकूण 3320 331 201

संबंधित बातमी :

पनवेलवरुन चालायला सुरुवात, मिळेल ते खायचं, नदीकाठी आंघोळ, अंधार पडला की वस्ती, 800 किमी चालून तरुण चंद्रपुरात

कोरोनाचा वाढता कहर, धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोणत्या परिसरात किती रुग्ण?

पुण्यात कोरोना बळींची संख्या 47 वर, आणखी दोघांचा मृत्यू

Published On - 12:21 am, Sat, 18 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI