यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85 वर, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या वयोवृद्धांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय

राज्यात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता यवतमाळमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Yavatmal)

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85 वर, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या वयोवृद्धांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 6:34 PM

यवतमाळ : राज्यात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता यवतमाळमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Yavatmal). आज (28 एप्रिल) आणखी 6 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे यवतमाळमधील कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यवतमाळच्या कॅन्टोनमेंट परिसरात इंदिरा नगर येथे 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने या भागातील 60 वर्ष आणि त्याच्यावरील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मधुमेह, रक्तदाब आणि अन्य आजारी व्यक्तींचा समावेश असणार आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.

यवतमाळमधील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 85 वर पोहचला आहे. आतापर्यंत यापैकी 10 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या यवतमाळमध्ये 74 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यवतमाळमध्ये कॅन्टोनमेंट भाग कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. इंदिरा नगरच्या पवार पुरा भागात आतापर्यंत 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. तसेच या भागातील वयोवृद्ध आणि इतर जोखमीचे आजार असणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 6 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे यवतमाळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 85 वर पोहचली आहे. सध्या यवतमाळमध्ये ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 75 इतकी आहे. मागील 3 दिवसांमध्ये (24 ते 27 एप्रिल या कालावधीत) एकूण 393 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले. यापैकी पूर्ण 393 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे 27 एप्रिलपर्यंत पाठवलेल्या एकाही नमुन्याचे अहवाल आता प्रलंबित नाही. आतापर्यंत तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1150 इतकी आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्याची स्थिती काय ?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Cases Update) आहे. आज (28 एप्रिल) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबत वसई-विरार, पालघर, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे.

मुंबईला कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मुंबईतील झोपडपट्टी (Maharashtra Corona Cases Update) परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी परिसरातील वीटी बेकरी परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आजच्या दिवसात आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा जणांपैकी 9 रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. यामध्ये रुपीनगर भागातील सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 1543 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

Maharashtra Corona Live | मालेगावात एकाच दिवसात तब्बल 48 नवे रुग्ण

साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला

कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

Total Corona Patient in Yavatmal

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.