मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत. विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या […]

मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत.

विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या मित्र परिवारासोबत थेट गोवा आणि कोकण गाठत आहे. मात्र येथे त्यांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी ट्रॅफिक जामची कसरत करत कसे बसे कोकणात पोहचत आहेत. तब्बल 15 ते 16 तासांचा प्रवासकरून पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. सध्या मुंबई गोवा महामार्गावर कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या दिसत आहे.

पेण वडखळ जवळ दीड ते दोन तासांच्या ट्रॅफिक जामनं पर्यटक हैराण झाले आहेत. या ट्रॅफिक जाममुळे मुंबईतून रत्नागिरी येण्यासाठी तब्बल 15 तासांचा प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे अधिकचा वेळ लागतोय. तर रत्नागिरीतून गोवा आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे.

अशीच परिस्थिती मुंबई-पुणे मार्गावरही दिसत आहे. विकेंड म्हटलं की मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या धावपळीच्या दुनियेतून आराम मिळवण्यासाठी मुंबई बाहेर जातो. पण तेथेही ट्रॅफिक जाममुळे चांगलीच पंचायत झालेली दिसत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.