गरज असेल तरच घराबाहेर पडा, तुकाराम मुंढेंचं नागपूरकरांना आवाहन

नागरिकांनी काही दिवसांसाठी घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे (Tukaram Mundhe appeals Napurkars).

गरज असेल तरच घराबाहेर पडा, तुकाराम मुंढेंचं नागपूरकरांना आवाहन

नागपूर : “नागरिकांनी काही दिवसांसाठी घराबाहेर पडणं टाळावं (Tukaram Mundhe appeals Napurkars). गरज असेल तरच घराबाहेर पडावं. घराबाहेर पडलात तर कुणाशीही हँडशेक करु नका”, असं आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे (Tukaram Mundhe appeals Napurkars). नागपुरात आतापर्यंत 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये प्रशासनाकडून कशाप्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांनी नागपुरकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.

“कोरोनाच्या पार्श्वभूवीर लग्न, समारंभांचे हॉल बंद करण्यात आले आहेत. एखादे आवश्यक लग्न असेल तर परिवारातीलच 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किराणा, भाजीपाला आणि दूध अशी जीवनाश्मक वस्तूंचे दुकाणं सुरु राहतील. आठवडी बाजार भाजीसाठी लागतात. त्यामुळे त्याविषयी अजून निर्णय घेतलेला नाही”, असं मुंढे यांनी सांगितलं.

“नागपुरात 4 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांकडे कर्मचारी दररोज जाऊन आवश्यक सूचना देत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

“नागपुरात सध्या एक कंट्रोल रुम तयार करण्यात आलं आहे. या कंट्रोल रुमचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला. या क्रमांकावर कुणाचा फोन आल्यास टीम घरी जाते. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त फोन आले आहेत”, असं मुंडे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Corona Effect | पुण्यात अमृततुल्य चहाची दुकान दोन दिवस बंद, दारु विक्रीवरही 31 मार्चपर्यंत बंदी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI