AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Racial Discrimination | ‘त्यांच्या लेखी सौंदर्याची व्याख्याच वेगळी’, छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींचे ‘मोठे’ दुःख!

बर्‍याच प्रतिभावान टीव्ही अभिनेत्रींना वर्णद्वेषाचा (Racial Discrimination) सामना करावा लागला होता.

Racial Discrimination | ‘त्यांच्या लेखी सौंदर्याची व्याख्याच वेगळी’, छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींचे ‘मोठे’ दुःख!
| Updated on: Nov 16, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : बर्‍याच टेलिव्हिजन अभिनेत्रींना (TV Serial Actress) त्यांच्या कारकीर्दीत अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावांना सामोरे जावे लागले होते. बर्‍याच प्रतिभावान टीव्ही अभिनेत्रींना वर्णद्वेषाचा (Racial Discrimination) सामना करावा लागला होता. सावळ्या रंगाच्या अभिनेत्रींना डावलून केवळ गोऱ्या वर्णाच्या अभिनेत्रींचीच निवड केली जाते, असे मत अनेक अभिनेत्रींनी व्यक्त केले. टीव्ही इंडस्ट्रीच्या अनेक नामांकित अभिनेत्रींनी वर्णद्वेषाच्या मुद्यावर मोकळेपणाने भाषण केले आहे (TV Serial Actress reacted on Racial Discrimination).

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांतर्गत अनेक वेगवेगळ्या विषयांवर, स्त्रियांवरील अत्याचारांबद्दल भाष्य केले जाते. या मोहिमांमधून बऱ्याचदा मनोरंजन विश्वाच्या काळ्याबाजूवर प्रकाश टाकला जातो. अशाच एका मोहिमेत छोट्यापडद्यावरच्या अनेक अभिनेत्रींनी झगमगाटी विश्वाचे वास्तव मांडले आहे.

नैना सिंह

‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडलेली नैना सिंह म्हणाली, ‘मी सावळ्या रंगाची आहे. माझ्या सावळ्या रंगामुळे, चेहऱ्यामुळे मला बर्‍याच वेळा नाकारले गेले आहे. त्यांनी नेहमीच गोऱ्या वर्णाच्या अभिनेत्रीला प्राधान्य दिले. यातील काही अभिनेत्रींना तर अभिनयही जमत नव्हता. तरी त्या गोष्टींचा काही फरक पडला नाही.’

एका तेलुगु चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान ‘ट्यूबलाइट खा, मग तू पांढरी होशील’, असे म्हणत तिला हिणवण्यात आल्याचे नैना सिंहने सांगितले.

राजश्री ठाकूर

शादी मुबारक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या राजश्री ठाकूरने काही काळापूर्वी हा कार्यक्रम सोडला होता. त्या म्हणाल्या, ‘लोक नेहमीच सौंदर्याला विशेषण कसे जोडतात? ‘सौंदर्य’ म्हणजे सौंदर्य असते. त्याला ‘डस्की’ हा शब्द का जोडला जातो? विशेषण जोडून सौंदर्याची तुलना करू नये.’ (TV Serial Actress reacted on Racial Discrimination)

सुचित्रा पिल्लई

मॉडेल आणि अभिनेत्री सुचित्रा पिल्लईने म्हटले की, तिला ‘फेअर अँड लवली’ ऐवजी डस्की म्हणलेले जास्त आवडते. सुचित्राला ‘डस्की’ हा शब्द चुकीचा वाटत नाही. ती म्हणते की, ‘मी 20 वर्षांपूर्वी या क्षेत्रात माझे करिअर सुरु केले होते. तेव्हाही गोऱ्या वर्णाला प्राधान्य होते. परंतु, तरीही माझ्या रंगाचे सर्वत्र कौतुक झाले. तसेच काम मिळण्यात मला कोणतीही अडचण आली नाही.’

रश्मी घोष

एकता कपूरच्या मालिकेत अभिनेत्री रश्मी घोषने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रश्मी म्हणते की, ‘डस्की म्हणणे मला अजिबात चुकीचे वाटत नाही. या क्षेत्रात मला आता बरीच वर्षे झाली आहेत. मला सुरुवातीला असा भेदभाव सहन करावा लागला होता. परंतु, माझ्या रंग कधीच माझ्या कामाच्या आड आला नाही.

पारुल चौहान

‘विदाई’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री पारूल चौहान यांनी वर्णभेदाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी सुंदर आहे आणि लोक मला ‘डस्की ब्युटी’ किंवा ‘ब्लॅक ब्यूटी’ म्हणून संबोधतात तेव्हा, मला अभिमान वाटतो. या गोष्टींची लाज वा द्वेष करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.’(TV Serial Actress reacted on Racial Discrimination)

निया शर्मा

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री निया शर्मा म्हणते, की मला कधीच ‘डस्की’ किंवा ‘सावळी’ म्हणतील याची पर्वा नव्हती. गोरी दिसावी म्हणून कधीच डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले नाहीत. चेहरा आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली. मात्र, सावळेपणाचा बाऊ केला नाही.

कश्मीरा शहा

वयाच्या चाळीशीतही नव्या अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत मागे टाकणाऱ्या कश्मीरा शहाने वर्णद्वेषाबद्दल आपला अनुभव शेअर केला. ती म्हणते, ‘सावळ्या रंगामुळे मी आत्मविश्वास गमावला होता. माझी आई गोरी होती. तिच्या प्रमाणे दिसावे म्हणून मी खूप पावडर लावायचे. मात्र, काहीच फरक पडत नसल्याने खूप रडू यायचे. चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीस यामुळे अडचणी आल्या. मात्र, नंतर माझ्या कौशल्याने काम मिळायला सुरुवात झाली. त्यावेळी वर्ण आणि रंग कधीच कामामध्ये आला नाही.’

(TV Serial Actress reacted on Racial Discrimination)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.