आई बॉल आणायला खाली उतरली, बाल्कनीतून तोल जाऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. गौरव शेवाळे असं या चिमुकल्याचं नाव आहे.

आई बॉल आणायला खाली उतरली, बाल्कनीतून तोल जाऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी नगर भागात (Two Year Old Boy Fell From Balcony) एक दुर्दैवी घटना घडली. दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. गौरव शेवाळे असं या चिमुकल्याचं नाव आहे. बुधवारी (30 जुलै) सायंकाळी ही घटना घडली (Two Year Old Boy Fell From Balcony).

गौरव आईसोबत घरात क्रिकेट खेळत होता. मात्र, त्याचा बॉल अचानक बाल्कनीतून खाली पडला. त्यामुळे बॉल घेण्यासाठी आई खाली आली. दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे आईला खाली येण्यासाठी थोडा वेळ लागला.

गौरव बाल्कनीतूनच खाली बघत होता. आई खाली बॉल घेत असतानाच गौरवचा अचानक बघता बघता तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. यामुळे गौरवच्या छातीला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गौरवला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केलं. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व शाळा-अंगणवाडी-कॉलेज बंद आहेत. त्यामुळे मुलं सध्या घरी आहेत. त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

गौरवच्या आईने जर विचार केला असता की आपलं बाळ लहान आहे. त्याला बाल्कनीत सोडून आपण खाली कस जावं. जर आई त्यालाही खाली घेऊन आली असती, तर कदाचित बाळाचा तोल गेला नसता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती (Two Year Old Boy Fell From Balcony).

संबंधित बातम्या :

टॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला

प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI