साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला

लॉकडाऊनच्या काळात दारु न मिळाल्याने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये ही घटना घडली.

साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन (Drinking Sanitizer Instead Of Liquor) आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे सध्या मद्यपी दारुऐवजी सॅनिटायझरचं सेवन करत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. यादरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दारु न मिळाल्याने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये (Drinking Sanitizer Instead Of Liquor) ही घटना घडली.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती गावातील दोन तरुणांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला आहे. हे दोघेही दुसऱ्या जिल्ह्यातून फलटणमध्ये आले होते. त्यामुळे या दोघांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. होम क्वारंटाईन केलेल्या या तरुणांनी दारु सदृश्य द्रव्य पदार्थाचं सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं (Drinking Sanitizer Instead Of Liquor).

प्राथमिक माहितीनुसार, या तरुणांनी दारु सदृश्य द्रव्य पदार्थाचं सेवन केलं (सॅनिटायझर), त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूने जिंती गावात एकच खळबळ माजली. किरण सुरेश सावंत (वय 29) आणि दीपक रघू जाधव (वय 32) अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फलटण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून त्याचा तपास पोलीस करत आहेत.

फलटणमधील आणखी एकाला कोरोना, साताऱ्यात रुग्णांचा आकडा 36 वर

दरम्यान, फलटण येथे आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवसांपूर्वी पुण्याहुन फलटणमध्ये आलेल्या युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे फलटणमधील कोरोनाबाधितांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात सध्या 36 कोरोना रुग्ण आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर (Drinking Sanitizer Instead Of Liquor) यांनी दिली.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला, कराडमध्ये 5 नवे रुग्ण

Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

APMC मार्केटमध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत एकूण 6 जणांना कोरोनाची लागण

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला नातेवाईकांकडून ‘जादू की झप्पी’, उत्साहाच्या भरात नियमांचे तीन तेरा

Published On - 5:21 pm, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI