BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

सागर जोशी

Updated on: Dec 02, 2020 | 1:40 PM

UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UKमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

नवी दिल्ली: पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये UK हा पहिला देश ठरला आहे, ज्याने कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UKमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. (UK give permission to corona vaccine of Pfizer/BioNTech)

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत.

भारतात पंतप्रधान मोदींकडून लसीचा आढावा

भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.

कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

“लस तयार करण्यासाठी साधारणपणे आठ ते दहा वर्ष लागतात. जास्त प्रयत्न केले तर लस तयार व्हायला कमीतकमी चार वर्ष लागतात. मात्र कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेऊन लस जास्तीत जास्त लवकर कशी तयार होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितलं.

संबंधित बातम्या :

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

CORONA UPDATE : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेले नवे दिशानिर्देश आजपासून लागू

UK give permission to corona vaccine of Pfizer/BioNTech

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI