AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CORONA UPDATE : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेले नवे दिशानिर्देश आजपासून लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 नोव्हेंबर रोजी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही प्रतिबंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

CORONA UPDATE : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेले नवे दिशानिर्देश आजपासून लागू
एकूणच, अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, 83 टक्के लोकांपैकी 81 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचं समोर आलं.
| Updated on: Dec 01, 2020 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यात अद्याप कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 नोव्हेंबर रोजी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही प्रतिबंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. (Implementation of new guidelines of Home Ministry regarding Corona from today)

केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे दिशानिर्देश

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  • सतत हात धुणे आवश्यक
  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • जलतरण तलाव फक्त खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सुरु राहतील
  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी
  • आंतराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु
  • राज्याअंतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवर बंधन नाही
  • फक्त बिझनेस टू बिझनेस हेतूने प्रदर्शने सुरु
  • 65 वर्षांवरील नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुलांना फक्त गरजेच्या आणि वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-19च्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचं पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितलं आहे. तसंच राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना सूचित केलं आहे.

केंद्राच्या परवानगीविना लॉकडाऊन नाही!

देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (MHA) बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पंजाबमध्ये रात्री संचारबंदीचे आदेश

पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री 9.30 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra lockdown : 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

Implementation of new guidelines of Home Ministry regarding Corona from today

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.