UPSC Result : पुण्यातल्या पोरांचा दिल्लीत झेंडा, यूपीएससीत घवघवीत यश

UPSC Result : पुण्यातल्या पोरांचा दिल्लीत झेंडा, यूपीएससीत घवघवीत यश

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे.

या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील तृप्ती दोडमिसे ही 16 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. मूळची पुणे येथील असलेल्या तृप्तीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून BE प्रोडक्शन म्हणून पदवी घेतली आहे. तर राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सध्या ती असिस्टंट कमिश्नर, सेल्स टॅक्स पुणे येथे कार्यरत आहे. तर तिचे आई-वडील पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत.

या परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पिंपळे खालसा या छोट्याशा गावामधील नचिकेत विश्वनाथ शेळके यांनी देशात 167 क्रमांक मिळवून यश संपादन केलंय. हे यश नचिकेतने चौथ्या प्रयत्नात मिळवलं. नचिकेतचे आई-वडील दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे लहानपणापासून नचिकेतला शिक्षणाची आवड होती. नचिकेतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे पिंपळे खालसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले, तर पुण्यामधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी

तृप्ती धोडमिसे – 16 वी

वैभव गोंदणे – 25 वा

मनिषा आव्हाळे – 33 वी

हेमंत पाटील – 39 वा

संबंधित बातम्या :

UPSC Result : पहिल्याच प्रयत्नात देशात पाचवा क्रमांक मिळवणारी सृष्टी देशमुख कोण आहे?

औरंगाबादमध्ये वॉटर ऑपरेटरच्या मुलाचं यूपीएससीत घवघवीत यश, देशात 155 वी रँक

लढाई-पढाई आणि निवडही एकत्रच, पुण्यातल्या रुममेटची यूपीएससीत बाजी

यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, सृष्टी देशमुखचा देशात पाचवा क्रमांक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें