US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा

निवडणुकीतील पराभवासह ट्रम्प यांना बसणाऱ्या झटक्यांची मालिकाच सुरु होते की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. आता त्यांना व्यक्तिगत आयुष्यातही लवकरच आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झालाय. यामुळे त्यांना मोठा झटका बसलाय. मात्र, या पराभवासह ट्रम्प यांना बसणाऱ्या झटक्यांची मालिकाच सुरु होते की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. आता त्यांना व्यक्तिगत आयुष्यातही लवकरच आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. मेलानिया (Melania Trump) डोनाल्ड ट्रम्प आपल्या लग्नाच्या 15 वर्षांनंतर आता घटस्फोट घेतील, असा दावा व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने केला आहे. मेलानिया या क्षणाचीच वाट पाहात होत्या, असाही दावा या महिलेने केलाय (US election 2020 Melania Trump may divorce Donald Trump soon claim ex aides).

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड यांची माजी सहकारीने सांगितलं, “टम्प यांचा बायडन यांच्याकडून पराभव झाल्यानंतर तात्काळ घटस्फोट देण्याचं मेलानिया (Melania Trump) यांनी आधीच ठरवलं होतं.” या बातमीत ‘मेलानिया या क्षणाचीच वाट पाहत होत्या’ असाही दावा करण्यात आलाय.

“जर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास ते आपल्या अधिकारांचा गैरउपयोग करुन आपल्याला त्रास देण्याची कारणं शोधतील असं वाटत असल्याने मेलानिया यांनी या क्षणाची वाट पाहिली,” असाही दावा या वृत्तात करण्यात आलाय. व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या ओमरोसा मॅनिगॉल्ट न्यूमेन नावाच्या महिलेने हा दावा केल्याचं डेली मेलने म्हटलंय. न्यूमेन व्हाईट हाऊसच्या सार्वजनिक संपर्क कार्यालयाच्या माजी संपर्क संचालक होत्या. मॅनिगॉल्ट न्यूमेन यांनी डिसेंबर 2017 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

या वृत्तात स्टेफनी वॉकऑफ यांच्या नावाचाही उल्लेख आहे. त्या मेलानिया यांच्या माजी वरिष्ठ सल्लागार आहेत. त्यांनी ट्रम्प आणि मेलानिया व्हाईट हाऊसमध्ये वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपत होते, असाही दावा केलाय. तसेच हे तडजोडपूर्ण लग्न होतं, असंही म्हटलंय.

संबंधित बातम्या :

कापसापासून धागा तयार होतो? चरखा पाहून मेलानिया ट्रम्प आश्चर्यचकित

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन

भरपूर पाणी, दिवसाला 7 फळं, सुडौल बांधा आणि नितळ त्वचेच्या मिसेस ट्रम्प यांचा डाएट

व्हिडीओ पाहा :

US election 2020 Melania Trump may divorce Donald Trump soon claim ex aides

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI