शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी दिल्या

शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 1:21 PM

मुंबई : राज्यातील शाळा (Schools Reopen) सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. (Varsha Gaikwad clarifies local administration to take decision on School Reopening)

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मुंबईत शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे. (Varsha Gaikwad clarifies local administration to take decision on School Reopening)

येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

(Varsha Gaikwad clarifies local administration to take decision on School Reopening)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.