फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. नागपूरच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले.

फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

नागपूर : नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत (Vegetable Price Hike). पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आठ दिवसांत किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार आहे (Vegetable Price Hike).

पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. नागपूरच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले.

सध्या नागपुरातील रामदारसपेठ भाजी बाजारात फुलकोबी 120 रुपये, दोडका 120 रुपये, मेथी 160 रुपये, कोथिंबीर 100 रुपये, टोमॅटो 80 रुपये, तर वांगी 70 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.

भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसतो आहे. शिवाय, या महागाईमुळे कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य ग्राहकांचं बजेटंही बिघडलं आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्याचं मत आहे.

Vegetable Price Hike

 संबंधित बातम्या : 

‘व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या’, कांदा निर्यात बंदीवर शरद पवार आक्रमक

केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

Published On - 9:02 am, Fri, 18 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI