VIDEO : पुण्यातल्या PSI ची सोलापुरात तलवार घेऊन दादागिरी

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : पुण्यात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय मदने याची दादागिरी समोर आली आहे. सोलापुरात हातात तलावर फिरवत नागरिकांना दमबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआयविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात पीएसआय दत्तात्रय मदने […]

VIDEO : पुण्यातल्या PSI ची सोलापुरात तलवार घेऊन दादागिरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : पुण्यात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय मदने याची दादागिरी समोर आली आहे. सोलापुरात हातात तलावर फिरवत नागरिकांना दमबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआयविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात पीएसआय दत्तात्रय मदने यांची दादागिरी समोर आली. दत्तात्रय मदने यांची करमाळ्यातील सावडी येथे शेती आहे. तिथे दत्तात्रय मदने यांनी कॅनॉल फोडून स्वत:च्या शेतात पाणी नेले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

या प्रकाराबाबत गावकरी पीएसआय दत्तात्रय मदने यांना जाब विचारायला गेले. त्यावेळी त्यांनी तलवार घेऊन नागरिकांना दमबाजी केली. पीएसआय मदने यांनी तलवार काढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. मदनेंचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कोण आहेत दत्तात्रय मदने?

दत्तात्रय मदने हे पीएसआय म्हणजे पोलिस उपनिरीक्षक आहेत. पुण्यातील कात्रज पोलिस ठाण्यात मदने पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. मदने यांची सोलापुरातील करमाळा जिल्ह्यातील सावडी येथे शेती आहे.

ज्या पोलिसांच्या हातात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, त्यांनीच अशी उघडपणे तलावरी घेऊन गुंडगिरी सुरु केली, तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे पाहायचं? शिवाय, आता या पीएसआय दत्तात्रय मदनेवर पोलिस प्रशासन काय कारवाई करतं आहे, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.