आधी ओबामांसोबत महत्त्वाची जबाबदारी, आता बायडन यांच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या दोघांची वर्णी निश्चित?

जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना  संधी मिळण्याची शक्यता आहे. ( Joe Biden administration's Cabinet)

आधी ओबामांसोबत महत्त्वाची जबाबदारी, आता बायडन यांच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या दोघांची वर्णी निश्चित?

वॉशिंग्टन: अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना  संधी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची खाती मिळणार असल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांमध्ये  प्रसिद्ध झाले आहे. वाशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिको यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Indian Americans Vivek Murthy, Arun Majumdar among likely in Biden administration’s Cabinet)

जो बायडन भारतीय वंशाचे विवेक मूर्ती यांना कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी आरोग्य आणि मानव सेवा मंत्रीपदावर संधी देऊ शकतात. तर, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रा. अरुण मजुमदार यांना उर्जामंत्रीपदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

विवेक मूर्ती यांनी जो बायडन यांना प्रचारादरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्याबाबत कोणती पावलं उचलावी लागतील याची माहिती दिली होती. विवेक मूर्ती कोरोना संदर्भात बायडन यांचे सल्लागार राहिले आहेत. तर अ‌ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी-एनर्जीचे माजी प्रमुख अरुण मजुमदार यांनी उर्जा विषयक घडामोंडीबाबत जो बायडन यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.

अरुण मजुमदार यांच्या सोबत उर्जा मंत्रिपदाच्या शर्यतीत अर्नेस्ट मोनिज, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डैन रिचर, माजी उर्जा राज्यमंत्री एलिझाबेथ शेरवूड रँडल आहेत.

आरोग्य मंत्री पदाच्या शर्यतीत विवेक मूर्ती यांच्यासोबत उत्तर कॅरिलोनच्या आरोग्य आणि मानव सेवा मंत्री मॅडी कोहेन आणि न्यू मेक्सिकोच्या गव्हर्नर मिशेल लुजान ग्रीशम यादेखील दावेदार आहेत.

ओबामांच्या कार्यकाळात महत्वाची भूमिका

विवेक मूर्ती यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांना कोरोना विषयक रणनिती ठरवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द अंतिम टप्प्यात असताना मूर्ती यांना अमेरिकेच्या 19 व्या सर्जन जनरल पदावर नामनिर्देशित केले होती. मूर्ती यांनी अमेरिकेतील ड्रग्ज, दारूच्या व्यसनाबद्दल महत्वपूर्ण अहवाल तयार केला होता. जनरल पदाचा कार्यभार सोडल्यानंतर विवेक मूर्ती अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवा आयोगातील सेवेअंतर्गत पोलिसांना प्रशिक्षण देतात.

बराक ओबामांनी अरुण मजूमदार यांची अ‌ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्टस एजन्सी- एनर्जीच्या संस्थापक संचालक पदावर नेमणूक केली होती. अरुण मजुमदार यांनी 2009 ते 2012 पर्यंत काम केले. मजुमदार यांनी 2012 नंतर काहीवेळ गुगलमध्ये उर्जा विषयक उपक्रमांमध्ये उपाध्यक्षपदावर काम केले.

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार

अमेरिकेच्या नियोजित अध्यक्षांकडून भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा, जो बायडन म्हणाले…

(Indian Americans Vivek Murthy, Arun Majumdar among likely in Biden administration’s Cabinet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI